Parbhani News : वादाच्या ठिणग्यावर ठिणग्या, मग 'मनोमिलन' कसे होणार ? महायुतीच्या मेळाव्यापासून गुट्टे, खान लांबच...

Mahayuti Melava : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे माझ्यावर विशेष प्रेम...'
Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavis
Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सत्तारूढ झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सरकारमध्ये सहभागी झाला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या प्रमुख पक्षासह इतर १५ घटक पक्ष महायुतीत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी तयार झालेल्या या महायुतीमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे घेण्यात आले.

प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी या मेळाव्यात अंतर्गत मतभेद विसरून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. मात्र, मुळात प्रत्येक पक्षात अंतर्गत मतभेद असताना संपूर्ण महायुतीमध्ये समन्वय साधण्याचे स्वप्न अधुरेच राहत असल्याचे दिसून येत आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष आहे.

Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavis
South Central Mumbai Lok Sabha Constituency: शाखाप्रमुख ते खासदार; राहुल शेवाळे पुन्हा मैदान गाजवणार ?

तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुट्टे हेच महायुतीचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असतील असे जाहीर केले होते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गुट्टे यांनी जाहीर सभेत सांगितले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. तसेच मी पण त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणून मला मतदारसंघातील विकासासाठी मोठ्याप्रमाणावर निधी मिळाला.

मात्र, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाखेड येथील संतोष मुरकुटे यांच्यावर झालेल्या पोलीस तक्रारीपाठीमागे गुट्टे हेच आहेत. मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, असे जाहीर केले होते. परस्परांवर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे अनुपस्थित राहिले असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे जिल्ह्यातील पाथरी येथील सईद खान हे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. खान यांनी नुकतेच पाथरी येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा आयोजित करून मोठे शक्तीप्रदर्शन केले. तसेच परभणी येथील कॉंग्रेस नेते माजुलाला यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. राज्यातील विविध भागातील अल्पसंख्याक समाजातील नेते सईद खान यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

मात्र, महायुतीच्या मेळाव्यात सईद खान (Saeed Khan) यांना टाळण्यात आले. पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना सईद खान यांनी मोठे आव्हान उभे केले. यामुळे दुर्राणी आणि खान यांच्यात राजकीय मतभेद आहेत. त्यामुळेच सईद खान यांना टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू असणाऱ्या अल्पसंख्याक नेत्याला टाळल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavis
OBC - Maratha Reservation : सरकारने दबावात निर्णय घेतला तर ओबीसी रस्त्यावर उतरणार…

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com