Marathwada Political News : दलित व मुस्लीम समाज ही कॉंग्रेस पक्षाची पारंपारिक व्होटबँक समजली जाते. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परभणीमध्येही दलित व मुस्लीम समाज वर्षानुवर्षे कॉंग्रेस पक्षासोबत राहिला. मात्र शिवसेना अल्पसंख्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी सातत्याने अल्पसंख्य समाजातील नेत्यांना शिवसेनेत (शिंदे गट) आणण्याचे प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य जिल्हा दौऱ्याच्यापूर्वी सईद खान यांनी काँग्रेसला दणका देत माजुलाला यांच्यासह तब्बल दीडशे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.3) मुंबईत हे प्रवेश करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांना इम्प्रेस करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. परभणी (Parbhani) शहरात मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणावार असल्याने त्यांचे मतदान निर्णायक असते.परभणी विधानभा निवडणुकीत हे सातत्याने दिसून आले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विखार लाला यांनी तब्बल 45 हजार मते मिळवत दुसरे स्थान मिळवले होते. या मतांमुळे कॉंग्रेसचा पराभव झाला होता.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार सय्यद खालेद यांनी सुध्दा द्वितीय स्थान मिळवले होते. त्यांना 45 हजार 58 मते मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत दोन मुस्लीम उमेदवारात समाजाची मते विभागाली गेली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मो.गौस यांना 22 हजार 794 तर तिसरे स्थान मिळवलेल्या अली खान मोईन खान यांना 22 हजार 741 मते मिळाली होती.
तब्बल चाळीस ते 45 चाळीस हजार एकगठ्ठा मते मिळत असल्याने परभणी विधानसभा मतदारसंघ व शहरात मुस्लीम समाजाच्या मतांना विशेष महत्व असते. माजुलाला यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉंग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्ह्यातील अल्पसंख्य समाजातील नेत्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उबाठा गटालाही समस्येचा सामना करावा लागू शकतो. शिवसेना (उबाठा), कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराला कॉंग्रेसच्या पारंपारिक व्होटबँकेचा लाभ मिळण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसचीच पारंपारिक व्होट बँक पक्षापासून दूर जात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत जात असल्याने निवडणुकीत शिवसेना उबाठा गटालाही धोका असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली. तसेच याच मुद्यावर भाजपशी युती करण्यात आल्याचे वारंवार सांगितले. असे असताना शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी परभणी जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या मुस्लीम समाजातील नेत्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला आहे. यामुळे सईद खान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील बनत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.