Latur Political News : राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिक हातची जाण्याची वेळ आली आहे. (Farems News) काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवावे, तर महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा आज आमदार अभिमन्यू पवार यांच्यासमोरच कडेलोट झाला.
प्रशासकीय इमारतीत बोलावलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पिक वाया जात असल्याच्या तक्रारी केल्या. हे ऐकून पवारांचाही पारा चढला आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बैठकीतूनच फोन लावला. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर (Abhimanyu Pawar) पवारांनी हे पाऊल उचलले.
आपला फोन महावितरणच्या अधिकाऱ्याला देत सभागृहातील माईकवरून फडणवीस आणि संबंधित अधिकाऱ्याचे संभाषण सगळ्या सभागृहाला ऐकवले. (Latur) आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे अजून मनस्ताप करण्याची वेळ येत असल्याचे कळताच फडणवीसही संतापले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलाच दम भरला.
`शेतकऱ्यांना जर कुठला अधिकारी अडचणीत आणत असेल तर त्याला सस्पेंड करेन. पाऊस नाही, पिके सुकून जात आहेत, शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न सतावत असतांना भविष्यातील उपाययोजना तर तुम्ही राबवाच पण तात्काळ उपाययोजना करून वीज वितरण सुरळीत सुरू करा. या कामांमध्ये जर कोणी हयगय करीत असेल तर तुम्हा सर्वांनाच मी घरी पाठवेन`, असा दम फडणवीसांनी फोनवरून दिला.
फडणवीसांनी खडसावल्याने बैठकीतील वातवरण गंभीर झाले होते, अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातील विजेच्या प्रश्नावर वीज पुरवठा अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व उद्योजक यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा ऐकून आमदार पवारही संतापले होते. त्यांनी भर बैठकीतूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि अधिकाऱ्यांना समज द्या अशी विनंती केली.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.