Maharashtra News : मुंबईत दोन दिवस होणाऱ्या `इंडिया`, च्या बैठकीसाठी देशभरातील भाजपविरोधक एकवटले आहेत. यावरून एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा संघर्ष सुरू झाला आहे. (India Meeting News) भाजपचे नेते `इंडिया`, च्या बैठकीला घमेंडिया डरपोकांचा मेळावा म्हणत टीका करत आहे. तर त्यांच्या प्रत्येक टीकेला इंडियातील घटक पक्ष व त्यांचे नेते जशास तसे उत्तर देत आहेत.
भाजपचे मुंबईतील नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या टीके नंतर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिले आहे. (Shivsena) निडर बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला डरपोक कसे म्हणता, हिंमत असेल तर निवडणुका लावा. किमान चंद्रपूर, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तरी घ्या, अशा शब्दात आव्हान दिले.
दानवे यांनी शेलार यांच्या ट्विटला उत्तर देतांना म्हटले आहे की, निडर बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला तुम्ही डरपोक कोणत्या तोंडाने म्हणता आशिष शेलार ही उपाधी तुम्हाला लागू होते. भित्रट नसाल तर लावा निवडणुका. (Maharashtra) नसेलच शक्य तर किमान पुणे, चंद्रपूरची पोटनिवडणूक लावून दाखवा. एवढेच प्रेम तुम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे होते तर त्यांच्या निधनाच्या नंतर काही काळाने 'मोदी लाटेवर' स्वार होत २०१४ साली आमच्या पक्षाशी युती तोडण्याचे काम का केले ?
स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान आहेत आणि राहतील. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कोणी बोट उचलते, त्याला चोख उत्तर आम्ही देतच असतो. त्याला तुमच्या पावतीची गरज नाही. इतकेच सावरकर प्रेम असेल तर त्यांना 'भारतरत्न' देऊन गौरव करा. ही आमची जुनी मागणी पूर्ण करून दाखवा. 'अतिथी देवो भव' ही आमची संस्कृती आहे. तुमची नसेल! आणि ज्यांचे स्वागत करतो आहोत, ते आपल्याच देशातील हाडामासाची माणसे आहेत. मुद्दाम विमान वळवून पाकिस्तानात जाऊन केक खाणाऱ्यातले आम्ही नाही. ते तुम्ही आहात!
जो महाराष्ट्र द्रोह तुम्हाला आज आठवतो आहे, तो गुजरातला उद्योग पळवले गेले तेव्हा नव्हता जागृत झाला. मराठी मुलांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचा सन्मान आठवला नाही! ही दिशाभूल आमची नाही करता येणार तुम्हाला, सोडून बोला, असा टोला देखील दानवे यांनी लगावला. शेलार यांनी ट्विट करत ठाकरे गटावर टीका केली होती.
मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला. ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे.
महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे. फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे, असे शेलार यांनी आपल्या ट्विटमधून ठाकरे गटाला डिवचले आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.