Marathwada Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे काल निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याने एक अभ्यासू नेता गमावल्याची भावना सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी व्यक्त केल्या. 1980 व त्यानंतर 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दोन वेळा आमदार होण्याची संधी मिळाली.
पैकी 1980 मध्ये इंदिरा काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर ते गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. 1995 मध्ये मात्र याच मतदारसंघात त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. सत्ता स्थापनेच्या स्पर्धेमध्ये निवडून आलेल्या अपक्ष आमदारांचे नेतृत्व करत अशोक पाटील डोणगावकर यांनी राज्यातले पहिले शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 73 आणि भाजपचे 65 उमेदवार निवडून आले होते. मात्र बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेत युतीच्या नेत्यांना अडचणी येत होत्या. (Shivsena-BJP) विशेष म्हणजे याच निवडणुकीत राज्यभरातून तब्बल 45 अपक्ष उमेदवार निवडून आले होते, त्यापैकीच एक अशोक पाटील डोणगावकर हे देखील होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्तेपासून रोखण्यासाठी युतीच्या नेत्यांनी अपक्षांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
तेव्हा या अपक्षांची मोट बांधण्याची जबाबदारी अशोक पाटील डोणगावकर यांनी स्वीकारली. अनेक अपक्षांच्या भेटीगाठी त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी घडवून आणण्यात डोणगावकर यांचा मोठा वाटा होता. या सगळ्या प्रयत्नांमुळे राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी या सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले. राज्यात जेव्हा युतीचे नेत्यांची भाषण व्हायची तेव्हा ते युतीचे सरकार असा उल्लेख करायचे.
त्यावेळी राज्यमंत्री असलेले अशोक पाटील डोणगावकर हे सातत्याने अपक्षांच्या मदतीमुळे हे सरकार सत्तेवर आल्याची आठवण भाषणातून करून द्यायचे. युती सरकारच्या झेंड्याला अपक्षांचा दांडा अशी टीकाही त्यावेळी केली जायची. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून अशोक पाटील डोणगावकर यांनी तीन वेळा निवडणूक लढवली. पैकी दोनदा ते निवडून आले. एकदा काँग्रेस कडून तर दुसऱ्यांदा अपक्ष. 1990 मध्ये त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला होता. त्यानंतरही 95 मध्ये त्यांनी राज्यात युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांचे नेतृत्व करत रसद पुरवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.