Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel : पराभवानंतर इम्तियाज जलील यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केले! संजय शिरसाट यांचा आरोप

Maharashtra Minister Sanjay Shirsat makes a serious allegation against Imtiaz Jaleel, accusing him of resorting to blackmail tactics after facing two consecutive electoral defeats. : उद्या 23 जून रोजी इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी तसेच त्यांना हद्दपार करावे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

SHIVSHENA-AIMIM : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाल्यामुळे इम्तियाज जलील यांना आता काही काम राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आता ब्लॅकमेलिंग सुरू केले आहे, असा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत केला. तसेच इम्तियाज जलील यांच्या आरोपांना योग्यवेळी उत्तर देईन, असेही शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावावर बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. सरकारी वर्ग दोनची जमीन, शेंद्रा एमआयडीसीमध्ये आरक्षण बदलून खरेदी केलेला भूखंड, शहराजवळील साहजापूर येथे विविध गटांमध्ये पंधरा ते वीस एकर खरेदी केलेली जमीन आणि हॉटेल व्हिट्स खरेदीसाठी राजकीय दबाव आणत केलेला व्यवहारस असे एक ना अनेक आरोप आणि त्याचे कागदोपत्री पुरावे माध्यमांसमोर आणत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात मोहीम उघडली.

या संपूर्ण प्रकरणात सरकारी वर्ग 2 ची जमीन शिरसाट यांनी आपल्या दोन्ही मुले आणि पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप करत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 'हरिजन' शब्दाचा उल्लेख केला. यावरून संतप्त झालेल्या आंबेडकरी संघटनांनी इम्तियाज यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज जलील अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सीबीआय कडे धाव घेतली.

Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : हाॅटेल खरेदीतून माघारीने संजय शिरसाट बॅकफूटवर! इम्तियाज जलील यांची सरशी..

ज्या प्रकरणांमध्ये आरोप केला त्या सगळ्या जमीन खरेदी व्यवहाराची कागदपत्रं त्यांनी तपास यंत्रणांकडे सुपूर्द केली. दरम्यान इम्तियाज जलील जातिवाद करत आहे, असा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय व अत्याचार कृती समितीने उद्या 23 जून रोजी इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी तसेच त्यांना हद्दपार करावे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना लक्ष करत केलेल्या आरोपानंतर त्यांचा बोलवता धनी दुसराच असल्याचे सांगत शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला होता.

Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat- Imtiaz Jaleel : इकडे फौजदारी दावा, तिकडे शिरसाटांच्या विरोधातील पुरावे घेऊन इम्तियाज जलील सीबीआयकडे!

याशिवाय संजय शिरसाट यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मधील भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि जमीन बळकवण्याच्या विरोधात देखील इम्तियाज जलील यांनी आवाज उठवावा, अशी मागणी करणारे सिल्लोडमधील नागरिक आणि भाजपचे काही पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या घरावर धडकले होते. यामागे संजय शिरसाट हेच असल्याची चर्चा आहे. याशिवाय या वादात वंचितने उडी घेत अफसर खान यांनी इम्तियाज जलील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी बंगल्यासाठी पैसे कुठून आणले? असा सवाल केला होता.

Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचे आरोप हलक्यात घेतले; म्हणाले काहीही होणार नाही!

माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी घाबरणार नाही, माझ्यातला पत्रकार आता जागा झाला आहे, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना वारंवार आव्हान दिले. तर वंचितच्आया आरोपाला आपण महत्व देत नाही, असे म्हटले होते. आता तर शिरसाट यांनी इम्तियाज यांच्यावर ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या दोन नेत्यांमधील संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र आहे. या संघर्षाचा शेवट कसा होतो? याकडे आता सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com