मोठी बातमी : इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला : MIM च्या कार्यकर्त्यांकडूनच गाडीतून बाहेर ओढून मारण्याचा प्रयत्न

Imtiaz Jaleel : महापालिका निवडणुकीतील उमेदवारीवरून नाराज एमआयएम कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करत मारहाणीचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.Sarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jaleel : एमआयएममध्ये तिकीट वाटपावरून असलेल्या नाराजी नाट्याचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात असलेला रोष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातूनच शहरातील जिन्सी भागातून प्रचारासाठी जात असताना इम्तियाज जलील यांच्या गाडीवर पक्षातील जलील विरोधी जमावाने हल्ला चढवला. हाताने काचा फोडण्याचा प्रयत्न, तसेच इम्तियाज जलील यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न झाला. प्रचारा दरम्यान, इम्तियाज यांना जागोजागी विरोध होत असून आजच्या हल्ला प्रकरणामुळे निवडणुक प्रचार आता गुद्यागुद्दीवर आल्याचे दिसून आले आहे.

एमआयएमने महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात गेल्यावेळी निवडणून आलेल्या 26 पैकी तब्बल 22 नगरसेवकांची उमेदवारी कापली. हा निर्णय इम्तियाज जलील यांनीच घेतल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यापैकी काहींनी अपक्ष तर काहींनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली आहे. दरम्यान, शहरात एमआयएमच्या उमेदवारांसाठी इम्तियाज जलील गल्लोगल्ली जाऊन प्रचार करत आहेत. अशाच एका प्रचार रॅलीसाठी जात असताना बायजीपूरा-जिन्सी भागातून इम्तियाज जलील हे आपल्या समर्थकांसह गाडीतून जात असताना पन्नास-शंभर जणांच्या जमावाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला तर काही हल्लेखोर हे चालकाच्या आणि दुसऱ्या बाजूने इम्तियाज जलील यांच्याकडे धावले. गाडीच्या बाहेर दरवाजा धरून उभ्या असलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यालाही या हल्लेखोरांनी मारहाण केली. गाडीत बसलेल्या इम्तियाज जलील यांना बाहेर ओढण्याचा जमावाचा प्रयत्न होता. यावेळी गाडीवर अंडेही फेकण्यात आले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखत गाडी वेगाने पुढे नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बऱ्याच अंतरापर्यंत हल्लोखोर गाडीचा पाठलाग करत गेले. यावेळी इम्तियाज यांना अर्वाच्य भाषेत शिव्याही देण्यात आल्या.

AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
Imtiaz Jaleel : तब्बल 22 माजी नगरसेवकांना नारळ; कट्टर शत्रूच्या मुलाला उमेदवारी : जलील यांचा मास्टर स्ट्रोक की सेल्फ गोल?

हल्लेखोर कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या नेत्याचे समर्थक होते, हे स्पष्ट झाले नसले तरी ज्या इच्छुकांची उमेदवारी एमआयएमने कापली त्यांचे समर्थकच ठिकठिकाणी इम्तियाज जलील यांना विरोध दर्शवत असल्याचे समोर आले आहे. अनेक भागात इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तर काही भागात काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांकडून त्यांना धक्काबुकीही झाली आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी लाठीमार करत हल्लेखोरांना पांगवले. एकूणच इम्तियाज जलील यांच्याविरोधातील रोष प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करणे अवघड झाले आहे.

AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
Sambhaji Nagar: चंद्रकांत खैरेंचा पुतण्या अन् प्रदीप जैस्वालांचा मुलगा मैदानात; संभाजीनगरच्या गुलमंडीमध्ये मतविभाजन गेम फिरवणार?

विशेष म्हणजे आजच पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत. पुढील सहा-ते सात दिवस ओवेसी हे प्रचारासाठी शहरातच तळ ठोकून असणार आहेत. एमआयएमच्या नाराज नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ओवेसी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. परंतु त्यांना अद्याप वेळ देण्यात आलेली नाही. इम्तियाज जलील आणि त्यांच्या मुलाने बसून उमेदवार ठरवले. वर्षानुवर्ष काम करणाऱ्या प्रमाणिक पदाधिकारी, माजी नगसेवक आणि कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com