Ambadas Danve-Atul Save News : इम्तियाज जलील यांच्या बिर्याणीचा ठसका अतुल सावे- अंबादास दानवेंना!

Imtiaz Jaleel’s biryani led to a heated clash between Atul Save and Ambadas Danve : तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, पण अजित पवार इथे येऊन आपली उधडून गेले. या परिस्थितीला एकटी भाजप जबाबदार आहे, असे मी म्हणत नाही, आपण सगळेच जबादार आहोत.
Atul Save-Ambadas Danve On Imtiaz Jaleel News
Atul Save-Ambadas Danve On Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP Controversy : स्वातंत्र्यदिनी मासंविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महापालिका आयुक्तांनी दिले होते. यावरून मोठे राजकारण झाले, सरकारवर टीकेची झोड उठली. एमआयएमनेही या निमित्ताने स्टटंबाजी करत संवग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारी आदेशाचा निषेध म्हणून आपल्या घरी बिर्याणी शिवजवली आणि मुख्यमंत्र्यांसह महापालिकांच्या आयुक्तांना निमंत्रित केले. अर्थात तिथे कोणी येणार नव्हते, मग इम्तियाज जलील यांनी एकट्यानेच बिर्याणीवर ताव मारला.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या या बिर्याणीचा ठसका मात्र भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे-अतुल सावे यांना लागल्याचे दिसून आले. गणेश महासंघाच्या कार्यक्रमात अतुल सावे-अंबादास दानवे यांच्यात व्यासपीठावरच जुंपल्याचे पहायला मिळाले. अतुल सावे यांनी अंबादास दानवे यांना उद्देशून 'तुम्ही त्या इम्तियाज जलीलचा उल्लेख हिरवा साप असा करत जा, तो हिरवा सापच आहे'. पण तुमचा मित्रही आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांना डिवचले.

हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती या जिल्ह्याचा खासदार, आमदार हा हिंदू असला पाहिजे. त्यांचे स्वप्न शिवसैनिकांनी पूर्ण केले. पहिला हिंदू आमदार, खासदार आपण निवडून दिला. आताही शहरात आम्ही तीन आमदार आहोत. पण इम्तियाज जलील हिंदूना डिवचण्यासाठी काहीही बोलतो, त्याचा उल्लेख तुम्ही हिरवा साप असा करत जा, तुमची मैत्री आहे म्हणून तुम्हाला सांगतो, असे सावे (Atul Save) म्हणाले.

Atul Save-Ambadas Danve On Imtiaz Jaleel News
Atul Save-Sanjay Shirsat News : कार्यक्रमाला पालकमंत्री शिरसाट दीड तास लेट, सावे म्हणाले, खैरेंसारखे वागू नका!

मग भाषणाची संधी मिळाली तेव्हा अंबादास दानवे यांनी आम्ही विरोधक म्हणून तुमचा कार्यक्रम करायचा ठरवलाच होता, पण तुम्ही थोडक्यात वाचले, अवघ्या सतराशे मतांनी निवडून आलात! तुम्ही राजकीय भाषण केले, पण हे गणेश महासंघाचे व्यासपीठ आहे, इथे राजकीय भाषण नको, असे मी मानतो. बोलायला गेलं तर खूप काही बोलता येईल. तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, पण अजित पवार इथे येऊन आपली उधडून गेले. या परिस्थितीला एकटी भाजप जबाबदार आहे, असे मी म्हणत नाही, आपण सगळेच जबादार आहोत, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

Atul Save-Ambadas Danve On Imtiaz Jaleel News
Ambadas Danve News : अंबादास दानवेंनी तत्परता दाखवली अन् दोन तरुणांचे जीव वाचले!

इम्तियाज यांची फालतूगिरी..

सावे-दानवे यांच्या या जुगलबंदीकडे व्यासपीठावर उपस्थितीत पालकमंत्री संजय शिरसाट हे लक्ष देऊन ऐकत होते. इम्तियाज जलील यांनी केलेला प्रकार हा फातलूगिरी आणि माकडचाळे होते, अशा शब्दात त्यांनी एमआयएमवर हल्ला चढवला. आपल्या शहरात भारत-पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे. एकीकडे ते आणि दुसरीकडे आपण. हिंदूचे सण इतक्या उत्साहात साजरे करा, की तिकडच्या लोकांना आपण किती जागृत आहोत, हे कळायला पाहिजे. महाराष्ट्रात आपले सण साजरे करताना इम्तियाज जलील यांच्यासारख्या औलादी आपल्या डिवचण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात ठेवा, असे आवाहन संजय शिरसाट यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com