

Chhatrapati Sambhajinagar News: एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या घरात टिसीएस धर्मांतर प्रकरणात आरोप असलेल्या निदा खानला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हेच घर अनाधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने आज जमीनदोस्त केले. यावरून शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू आहे.
मतीन पटेल हा फक्त मोहरा आहे, खरा म्होरक्या इम्तियाज जलील हा 'अर्बन दहशतवादी' असल्याचा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून इम्तियाज जलील यांच्या चौकशीची, त्यांच्या अटकेची मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले.
इस्लामचे नाव घेऊन इम्तियाज हा लोकांना भडकावू पाहतोय. त्याने समोर येऊन निदा खान हिच्याशी आपला काही संबंध नाही, तिला आपण मतीन पटेलच्या घरात लपवले नाही, हे का सांगत नाही? या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी झाली तर ते जेलमध्ये असतील, असा दावा शिरसाट यांनी केला.
मंत्री संजय शिरसाट यांच्या या आरोपाची खिल्ली उडवताना 'मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. शहराचे दुर्दैव आहे, की आम्हाला इतका भ्रष्ट नेता पालकमंत्री म्हणून मिळाला. त्यांनी मला 'अर्बन दहशतवादी' म्हटले. त्यावर माझे एकच उत्तर आहे की त्यांनी 'टेरेरिस्ट' चे स्पेलिंग लिहून दाखवावे, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांची खिल्ली उडवली.
पालकमंत्र्यांनी अनावश्यक वक्तव्ये करू नयेत. त्यांनी माझ्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायची असेल तर जरूर करावी. त्याचबरोबर मी केलेल्या आरोपांचीही चौकशी करावी, ही चौकशी लागली तर शिरसाट हे काही महिन्यांतच हर्सूल जेलमध्ये दिसतील, असा दावाही केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.