

Aimim News : नवनीत राणा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. चार बायका आणि एकोणावीस मुलं' या एका मौलानाच्या विधानाचा दाखला देत हिंदूंना 3-4 मुलं जन्माला घालण्याचा सल्ला नवनीत राणा यांनी दिला होता. यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना आता राजकारणात करण्यासारखं काही उरलं नाही, तेव्हा त्यांनी परत चित्रपटसृष्टीत परतावं, असा टोला लगावला आहे.
व्हाॅट्सपवर आलेली प्रत्येक रील किंवा त्यातील विधानाचा संबंध हिंदुस्थानातील मुस्लिमांशी जोडून त्यावर बरळण्याची फॅशन आपल्या देशात सुरू झाली आहे. नवनीत राणा यांनी केलेले हे विधान त्याचाच एक भाग आहे. राजकारणात त्यांना करण्यासाठी आता काही उरलेले नाही, फावला वेळ भरपूर असल्याने अशा प्रकारचा बिनडोकपणा त्या सातत्याने करत असतात, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना सुनावले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही त्यांची ही नवीन दुकानदारी आहे. ते एकत्र आले याचा आनंद आहे, आता मुंबईत लोक ठाकरेंना गांभीर्याने घेतात? की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हे लवकरच स्पष्ट होईल, असेही इम्तियाज जलील म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात माजी महापौर अब्दुल रशीद खान यांनी प्रवेश केला. पण चंद्रकांत खैरे यांनी त्यांना झिडकारत विरोध केला आहे. याकडे लक्ष वेधले असता जाहीरपणे एका माजी महापौराचा अपमान करणे खैरे यांना शोभा देत नाही.
रशीद मामू यांनीही जिथे आपल्याला मान सन्मान मिळत नाही, तिथे थांबायचे का? याचा विचार केला पाहिजे. त्यांनी आमच्याकडे यावे, त्यांना इथेच योग्य सन्मान मिळू शकतो, असे म्हणत त्यांनी रशीद मामू यांना एमआयएममध्ये येण्याची आॅफर दिली. नगर पालिका निवडणुकीत एमआयएमला शंभर जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती, परंतु तसे घडले नाही. अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गडबड केली. बीड, नांदेड, परभणी, उदगीरमध्ये आम्ही जोर लावला होता. तरी तिथे आम्हाला यश मिळाले नाही.
काही उमेदवारांनी पक्षाला न विचारताच निवडणुकीतून माघार घेतली. अशा तीन ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही पक्षातून पाच वर्षासाठी निलंबित करत असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत मोठे मोठे दावे करणारे आमचे पदाधिकारी प्रत्यक्ष कधीच निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नाहीत. अशांना आता आम्ही महापालिका निवडणूका लढवायला लावणार आहोत, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले. पण ते सत्तेत कोणासोबत बसले आहेत, तर भाजपसोबत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला मत म्हणजे भाजपला (BJP) मत हे जर आमच्या लोकांना समजंत नसेल तर काय करणार? अशी उद्विग्नताही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.