Maharashtra New DGP: मोदी सरकारच्या समितीकडून 'ग्रीन सिग्नल'; महाराष्ट्राशी खास कनेक्शन असणारा डॅशिंग अधिकारी लवकरच होणार 'DGP'

Sadanand Date Maharashtra entry update : सदानंद दातेंच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीवर शिक्कामोर्तब झाले असून केंद्र सरकारने याबाबत मोठी अपडेट दिली आहे. सविस्तर वाचा.
Sadanand Date appointed in Maharashtra
Sadanand Date appointed in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख असलेले सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सदानंद दाते यांना महाराष्ट्र केडरमध्ये परतण्यास मंजुरी दिल्याने महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक निश्चित मानली जात आहे.

Sadanand Date appointed in Maharashtra
Prashant Jagtap : शरद पवारांचा 26 वर्षे 'विश्वासू' शिलेदार; निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा; प्रशांत जगतापांनी सांभाळलीय 'ही' मोठी पदं

गृह मंत्रालयाच्या प्रस्तावास मंजुरी देत सदानंद दाते यांची मुदतीपूर्व प्रतिनियुक्ती समाप्त करण्यात येत असून, त्यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परत पाठवले जात असल्याचे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. दाते यांना राज्यात परत पाठवण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने गृह मंत्रालयाला केली होती.

भारतीय पोलिस सेवेचे १९९० च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. एक एप्रिल २०२४ रोजी, दाते यांची ‘एनआयए’च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी ते महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सहपोलिस आयुक्त (गुन्हे) यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Sadanand Date appointed in Maharashtra
Mahendra Harpalkar : महेंद्र हरपाळकर यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची धुरा; निकाल, मुलाखतींच्या प्रक्रियेला गती

केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कायदा आणि न्याय विभागात संयुक्त सचिव म्हणूनही काम केले होते. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला तीन जानेवारी २०२६ ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर सदानंद दाते यांची नियुक्ती अपेक्षित आहे. राज्याचे पोलिस प्रमुख म्हणून त्यांना डिसेंबर २०२७ पर्यंतचा दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com