Imtiaz jaleel News : नवनीत राणांवर टीका करताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली!

Imtiaz jaleel Vs Navneet Rana : जाणून घ्या, इम्तियाज जलील यांनी जाहीर सभेत नेमकं काय केलं आहे विधान?
Imtiaz Jaleel On Navneet Rana
Imtiaz Jaleel On Navneet RanaSarkarnama

Loksabha Election 2024 : हैदराबादमध्ये जाऊन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान देत पंधरा संकेदासाठी पोलिस हटवा मग तुम्हाला कळेल? अशी भडकाऊ भाषा करणाऱ्या अमरावतीमधील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांवर अखेर छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बोललेच. मी अशा बाईला महत्व देत नाही, माझ्याकडे तेवढा वेळही नाही, असे म्हणत बोलणे टाळणाऱ्या इम्तियाज यांनी प्रचार संपता संपता नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिले.

'या बाईला जास्त महत्व देऊ नका, ती चीप दर्जाची बाई आहे. या चिल्लर लोकांना एवढे महत्व देण्याची गरज नाही. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाण्याची नवनीत राणा यांची सवय आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा हट्ट त्यांच्या अंगलट आला होता. आता तुम्ही जर त्यांना दहा मिनिटे कॅमेऱ्यासमोर दाखवतो म्हटलं तर त्या नाचायलाही कमी करणार नाहीत.' अशा शब्दांमध्ये इम्तियाज जलील(Imtiaz jaleel) यांनी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Imtiaz Jaleel On Navneet Rana
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेचा काॅन्फिडन्स वाढला; विजयाच्या दाव्यासह मताधिक्यही सांगून टाकले..

याशिवाय 'भाजपला कोणीतरी भुंकायला हवं असतं म्हणून त्यांनी नवनीत राणा यांना इथे आणले आहे.', अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा(Navneet Rana) या एमआयएमला दिलेल्या आव्हानामुळे चर्चेत आल्या आहेत. हैदराबाद येथील प्रचारसभेत त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 'पंधरा मिनिट के लिए पोलिस हटा दो' या वादग्रस्त वक्तव्याचा हवाला देत पंधरा मिनिट कशाला फक्त 'पंधरा सेंकदासाठी पोलीस हटवा' मग तुम्हाल समजेल, असे प्रक्षोभक विधान नवनीत राणा यांनी केले होते.

त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर नवनीत राणा या जळगाव, संभाजीनगर, जालना मतदारसंघात महायुतीच्या प्रचारार्थ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार व संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील यांना विचारले तेव्हा त्यांनी नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली.

Imtiaz Jaleel On Navneet Rana
Harshvardhan Jadhav : संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ठरलं... ‘या’ उमेदवाराला दिला पाठिंबा...

अमरावती येथील एका मेळाव्यात राणा यांनी इम्तियाज जलील यांचा उल्लेख ओवैसी का चमचा, असा केला होता. संभाजीनगरवाले इसबार अपने उपर लगा हुआ दाग धो डालेंगे, अशा शब्दात डिवचले होते. तेव्हापासूनच नवनीत राणा आणि एमआयएममध्ये वादाची ठिणगी पडली होती. इम्तियाज जलील यांनी स्वतः अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्यासाठी सभा घेतली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com