Aimim : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या राज्याच्या निर्णयाला केंद्राने मंजुरी दिली. नावावरून भाजपने राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील (Aurangabad) औरंगाबादचे नाव तुम्ही छत्रपती संभाजीनगर केले, मग बिहारमध्ये असलेले औरंगाबाद तुम्हाला कसे चालते? असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला लगावला.
या नामांतराच्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नामांतराच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. (Aimim) यावेळी भाजपवर निशाणा साधतांना इम्तियाज जलील म्हणाले, शहरांची नावे बदलून घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपचा चेहरा आम्ही जगासमोर आणणार होतो.
शहरात जी-२० परिषदे दरम्यानच आंदोलनाचा इशारा आम्ही दिला होता. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, जिल्हाधिकारी व प्रशासनाकडून मला फोन आले. जी-२० परिषदे निमित्त जगभरातील विदेशी पाहुणे शहरात आलेले असतांना त्यांच्या समोर आंदोलन करू नका, अशी विनंती मला करण्यात आली.
आपल्या देशाची मान खाली जावू नये म्हणून मी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. पण नामांतराच्या विरोधातील आमचा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत सरू राहील. माझी भाजपला आणि ज्यांनी कुणी शहराचे नाव बदलण्याची मागणी केली, त्या सगळ्या पक्षांना सूचना आहे की त्यांनी आता पुणे, कोल्हापूर, नागपूर या शहरांची नावे देखील महापुरूषांच्या नावांवर ठेवावीत.
आमचे दोन आमदार त्याला पाठिंबा देतील, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला. नामांतरानंतर आता जो काही कागदोपत्री बदल करावा लागणार आहे, त्यासाठी कोट्यावधींचा खर्च येणार आहे. तो आता नामांतराची मागणी करणाऱ्या जिल्ह्यातील नेते संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे यांनी करावा, असा चिमटा देखील इम्तियाज यांनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.