Loksabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एका दिवसात पक्ष प्रवेश आणि लोकसभेची उमेदवारी मिळल्यामुळे अफसर खान चर्चेत आहेत. परंतु वंचितने दिलेली ही उमेदवारी मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यावर 'वंचित'चे(Vanchit Bahujan Aaghadi) राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी हा आरोप फेटाळतानाच आम्ही मुस्लिमांची मतं फोडण्यासाठी नाही, तर हिंदू आणि समाजातील वंचित घटकांची मतं मिळवण्यासाठी निवडणूक लढवत आहोत, असा दावा केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील हे वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची युती असल्यामुळे निवडून आले होते. त्यांना फक्त मुस्लिमांनीच निवडून दिलेले नाही, अनेक वंचित घटक, हिंदूंनीही त्यांना मते दिली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे वंचितने अफसर खान यांना उमेदवारी दिल्यानंतर आमच्यावर मत विभाजनासाठी निवडणूक लढवत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी जेव्हा राज्यातील प्रस्थापित मुस्लिम नेत्यांविरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले होते, त्याचे काय? या घटनेकडे ज्या नजरेतून पाहिले गेले, त्याच नजरेतून अफसर खान यांच्या उमेदवारीला पाहिले पाहिजे, असे आवाहन नदाफ यांनी केले.
एमआयएम(AIMIM) सोबत युती तुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तो आमचा अधिकार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे एमआयएमला संभाजीनगरात विजय मिळाला, पण मुस्लिम मतदारांनी मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना मदत केली नाही, हे सत्य नाकारता येणार नाही.
अफसर खान यांच्याकडे केवळ मुस्लिम उमेदवार म्हणून पाहणे अन्यायाचे ठरेल. ते समाजातील प्रत्येक वंचित घटकाचे प्रतिनिधी आहेत, ज्यामध्ये हिंदू पण आहेत. अफसर खान यांच्या उमेदवारीनंतर त्यांची बदनामी केली जात आहे, पण ती न करता वंचित समूहाचा आवाज म्हणून त्यांच्याकडे बघितले पाहिजे, असे आवाहन करताना संभाजीनगरमधून वंचितचा खासदार अफसर खान यांच्या रूपाने दिल्लीत जाणार, असा विश्वास इम्तियाज नदाफ यांनी व्यक्त केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.