Kolhapur Lok Sabha Constituency : सरकारी मालकीच्या संस्था भाजपने उद्योगपतींना विकल्या, आमदार पाटील कडाडले !

Modi's government has no policies for youth & farmers : मोदी यांच्या सरकारकडे तरुणाई, शेतकरीहिताची धोरणे नाहीत
Mla P. N. Patil
Mla P. N. Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयासाठी आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी भाजपवर निशाणा साधत थेट केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

दरवर्षी देशातील दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले होते. त्यानुसार दहा वर्षांत वीस कोटी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे तरुणाई, शेतकरी (Farmar) हिताची धोरणे नाहीत. तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच नाहीत. उलट भाजप सरकारने, फायद्यात असलेल्या सरकारी मालकीच्या तब्बल 26 संस्था उद्योगपतींना विकल्या, असा गंभीर आरोप या वेळी करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mla P. N. Patil
Mangaldas Bandal News : फडणवीसांची भेट घेणं मंगलदास बांदल यांना भोवलं; 'वंचित'कडून शिरूर लोकसभेची उमेदवारी रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे कोणासाठी सरकार चालवित आहेत ? उद्योगपतींसाठी की सर्वसामान्य लोकांसाठी ? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते आमदार पी.एन. पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ करवीरमध्ये मेळावा पार पडला. या सभेत आमदार पाटील बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे सांगितले होते.

भाजप (BJP) सरकारला दहा वर्षे झाली, पण शेतकऱ्यांना काही कर्जमाफी मिळाली नाही. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारने नेहमीच शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांच्या उत्कर्षासाठी धोरणे राबविली. शेतकऱ्यांसह संपूर्ण समाज घटकाच्या उन्नतीसाठी पुन्हा एकदा इंडिया आघाडीला साथ द्या, असे आवाहन आमदार पी. एन. पाटील यांनी केले.

Mla P. N. Patil
Kolhapur Politics : संचालकांची झाली मोठी गोची, सोबतीचे नेतेच झाले एकमेकांचे विरोधक; कुणाच्या मागे जायचं?

म्हणून माझी उमेदवारी

केंद्रातील सरकारकडे शेतकरीहिताची दृष्टी नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारकने स्वीकारली नाही. उलट सरकारी यंत्रणांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रकार केला. पंजाबमधील शेतकरी आंदोलनानंतर भाजप सरकारची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी पडेल, अशी भीती वाटते. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात आहे. रयतेच्या बळावर माझी उमेदवारी असून विजय निश्चित आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.

Edited By : Chaitanya Machale

R

Mla P. N. Patil
Lok Sabha Election 2024: पूर्वी आमच्या वाड्यात तुताऱ्या वाजायच्या..., चिन्हावरून उदयनराजेंनी पवारांना ललकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com