Chhatrapati Sambhajinagar News : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. सोळाव्या दिवशी या आंदोलनाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. (Antarwali Sarati News) मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला.
आधी सरकारकडून शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहे. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आता या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अंतरवाली येथील आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. ठिकठिकाणा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चे निघत आहेत. बंद पुकारला जात आहे. हीच बाब लक्षात घेता आता मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन उपोषण आंदोलन करणाऱ्यांना तात्काळ उपचार पुरवण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. आरक्षणाबाबत राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन, सर्व सूत्रे हाती घ्यावीत. राज्यात कुठेही निदर्शने होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती औरंगाबाद खंडपीठाने या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.