MLA Ranjit Kamble On BJP : मोदी-शाहांना धडा शिकवण्यासाठी देशातील 28 पक्ष एकत्र; आमदार कांबळेंचा भाजपवर हल्लाबोल

Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा वर्ध्यातील सेवाग्राम येथे समारोप झाला.
MLA Ranjit Kamble
MLA Ranjit Kamble Sarkarnama

चेतन व्यास :

Wardha News: "देशात मोदी सरकार येण्यापूर्वी सत्तर वर्षांत भारतावर ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, पण २०१४ ते आतापर्यंत हे कर्ज १०० लाख कोटींनी वाढले असून, आता ते कर्ज १५५ लाख कोटींपर्यंत गेले आहे. एकीकडे देशावर वाढत्या कर्जाचा डोंगर, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे", असा घणाघात आमदार रणजित कांबळे यांनी मोदी सरकारवर केला.

"मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी देशातील २८ राजकीय पक्षांनी एकत्र येत पुढील लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी 'इंडिया आघाडी' बनवली आहे. ही आघाडी तयार होताच केंद्र सरकार घाबरले असून, आता देशाच्या नावात 'इंडिया' ऐवजी भारत हा शब्द वापरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे", असा आरोपही कांबळे यांनी केला.

MLA Ranjit Kamble
Nusrat Jahan ED News : ममता बॅनर्जींच्या निकटवर्तीय, 'टीएमसी'च्या खासदार नुसरत जहाँ अडचणीत...? 'हे' आहे कारण

भाजपच्या लक्षात आले की, 'इंडिया आघाडी'कडे देशातील ६७ टक्के व्हाेट, तर 'एनडीए'कडे ३३ टक्के आहेत. त्यामुळे ते घाबरत असून, त्यांनी 'इंडिया' नाव बदण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जर असे असेल तर त्यांना रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया, एअर इंडिया, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, 'आयएएस', 'आयआरएस' यांसह इतर नावे बदलावी लागतील, असा निशाणाही त्यांनी मोदी सरकारवर साधला. जनसंवाद यात्रेच्या समारोपीय सभेत सेवाग्राम येथे आमदार रणजित कांबळे होते.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यावर या पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळणार, असे सांगितले होते, पण किती लोकांना घरे मिळाली, हे समोरच दिसत आहे. देवळीचे उदाहरण घेतले तर ते खासदाराचं गाव आहे, येथील ६३२ लाभार्थ्यांना आतापर्यंत आवास योजनेचा केंद्र सरकारचा दुसरा हप्ता ९० हजार रुपये मिळालाही नाही. त्यामुळे अनेकांची घरे अर्धी बांधलेली आहेत, अशी टीकाही आमदार कांबळे यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा वर्ध्यातील सेवाग्राम येथे समारोप झाला. आमदार रणजित कांबळे यांच्यासोबत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी यात्रेत पाहायला मिळाली. या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना कांबळे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Edited by - Ganesh Thombare

MLA Ranjit Kamble
CM Shinde on Viral Video: 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून सारवासारव; स्वत:च सांगितलं नेमकं काय घडलं होतं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com