Shivsena UBT News : वैजापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना तोंडघशी ; चिकटगावकर गेले, परदेशींची पलटी

In Vaijapur, Thackeray group's maths failed : दोन वर्षापासून पक्षात काम करणारा आणि शिंदेच्या आमदाराला टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार ठाकरे गटाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर गमावला. तर ज्या भाजपच्या दिनेश परदेशी यांच्यासाठी पायघड्या घातल्या, त्या परदेशी यांनीही ठाकरे गटाकडे पाठ फिरवली.
Uddhav Thackeray-Bhausaheb Patil Chikatgaonkar
Uddhav Thackeray-Bhausaheb Patil ChikatgaonkarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Political News Vaijapur : राजकारणात एखादा निर्णय चुकला की तो कसा अंगलट येतो ? हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील घडामोडींवरून दिसून आले आहे. दोन वर्षापुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना आमदारकीचा दिलेला शब्द पक्षाने फिरवला. भाजपचे स्थानिक नेते माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांना पक्षात घ्या, असा आग्रह ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याकडे धरला.

राष्ट्रवादीतून पक्षात आलेले चिकटगावकर आता कुठे जाणार? असा अतिआत्मविश्वास ठाकरे गटाला नडला आणि परदेशी यांच्या केवळ पक्ष प्रवेशाच्या चर्चेनंतर माजी आमदार चिकटगांवकर यांनी थेट पक्षाला जय महाराष्ट्र करत दणका दिला. प्रवेशाच्या चर्चेचे साईड इफेक्ट पाहून शिवसेनेची (Shivsena UBT) मशाल हाती घेऊ पाहणाऱ्या परदेशी यांना त्याचे चटके आधीच जाणवू लागले आणि त्यांनी पलटी मारली.

दोन वर्षापासून पक्षात काम करणारा आणि शिंदेच्या आमदाराला टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार ठाकरे गटाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर गमावला. तर ज्या भाजपच्या दिनेश परदेशी यांच्यासाठी पायघड्या घातल्या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः वैजापूरला आले, त्या परदेशी यांनीही ठाकरे गटाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पक्षप्रवेशासाठी वैजापूरात आलेल्या उद्धव ठाकरे यांना कार्यकर्ता मेळावा घेऊन माघारी परतावे लागले. `तेल गेले, तूप गेले हाती राहिले धुपाटणे`, अशी काही अवस्था ठाकरे गटाची वैजापूर विधानसभा मतदारसंघात झाली आहे.

Uddhav Thackeray-Bhausaheb Patil Chikatgaonkar
Shivsena Leader Ambadas Danve News : अंबादास दानवे म्हणतात, भाजप शिंदेंना रडवेल

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर अद्याप दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतलेला नाही. पण ते आता माघारी फिरण्याची शक्यता मावळली असून ठाकरे गटाला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. (Uddhav Thackeray) इच्छुकांची संख्या मोठी असली तरी विद्यमान आमदाराला पराभवाची धूळ चारू शकेल, अशी नावे यात फारसी दिसत नाही. अशावेळी शिवसेनेच्या भात्यात एक बाण असताना दुसरा ठेवण्याची केलेली अतिघाई ठाकरे गटाला नडली असेच म्हणावे लागेल.

दुसरीकडे शिंदेंचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे मात्र या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून पुढची वाटचाल करतान दिसत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात आज तरी ठाकरे गट अडचणीत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत वैजापूरची जागा ठाकरे गटाकडे जाईल, मात्र भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडवून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray-Bhausaheb Patil Chikatgaonkar
Shivsena UBT News : ठाकरेंनी शब्द फिरवला, माजी आमदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र..

वैजापूरची जागा स्वतःकडे घेऊन राष्ट्रवादीकडे असलेली गंगापूर-खुलताबादची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा पर्याय दोन्ही पक्षांसमोर असल्याची चर्चा आहे. येत्या पंधरा दिवसात वैजापूरची जागा ठाकरे गट लढवणार? की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com