maharashtra cabinet : हवे असलेले खाते अन् बंगल्याचे पर्याय ; शिंदे-फडणवीसांची बहुपर्यायी पद्धत

कोणताही मंत्री नाराज होऊ नये यासाठी काल सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती आहे.
maharashtra cabinet
maharashtra cabinetsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सत्ता स्थापनेनंतर ४० दिवसांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाला. तो एवढा का लांबवला याच्या अनेक शक्यता उघडपणे चर्चिल्या जात होत्या. मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडल्यानंतर लेगच दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल (10 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. (maharashtra cabinet news update)

या बैठकीत खातेवाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी मंत्रिमंडळात झालेल्या चर्चा आणि निर्णयाबाबत माहिती दिली. खातेवाटपाबाबत बोलण्यास मात्र दोन्ही नेत्यांनी नकार दिला.

खाते वाटप अजून झाले नसले तरी मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यामुळे कोणताही मंत्री नाराज होऊ नये यासाठी काल सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती आहे.

maharashtra cabinet
Shiv sena : म्हणून आम्ही शिवसेना फोडली ; भाजपच्या बड्या नेत्यानं सांगितलं कारण..

काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर कोणत्या मंत्र्याला कोणते खाते हवं याचा पर्याय मागितल्याची माहिती आहे. कोणता बंगला हवा आहे याचाही ऑप्शन मागितला असल्याची माहिती आहे. मंत्री नाराज होऊ नयेत यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी हा मार्ग काढल्याची माहिती आहे. कुणाला कुठलं खातं द्यायचा आणि कुठला बंगला द्यायचा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुपर्यायी पद्धत ठेवली असल्याची माहिती आहे. पर्याय आल्यानंतर त्यावर एकत्रितपणे विचार करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

सरकारी बंगल्याबाबत प्रत्येक मंत्र्यांकडून दोन ते तीन बंगल्यांचे ऑप्शन मागितले आहेत. खाते वाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचा प्रयत्न आहे.

ठाकरे सरकारमध्ये आमदारांना सन्मान मिळत नव्हता, मंत्री भेटत नव्हते, असा आरोप करण्यात येत होता. या सरकारमध्ये तसं होऊ देऊ नका अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती आहे. काही विषय असेल तर आमच्याकडे या, आपलं हे सरकार सर्वांनी मिळून चालवायचे आहे, असे मुख्यत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com