IT Raid in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात बड्या व्यावसायिकांवर Income Tax ची छापेमारी; रडारवर कोण?

Chhatrapati Sambhajinagar Income Tax Dept. News : शहरातील मोठ्या आणि नामवंत व्यावसायिकांची यात नावे असल्याची जोरदार चर्चा...
IT Raid in Sambhajinagar :
IT Raid in Sambhajinagar :Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. शहरातील काही नामवंत व्यावसायिकांवर करचुकवेगिरी केल्यामुळे त्यांच्यावर ही छापेमारीची कार्यवाही करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यावसायिकांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे, असे वृत्त एका मराठी वाहिनीने दिले आहे. (Latest Marathi News)

IT Raid in Sambhajinagar :
Sambhajinagar Loksabha Constituency : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे- फडणवीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार?

या व्यावसायिकांचे नावे अद्याप जरी पुढे आले नसले तरी छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठे आणि नामवंत व्यावसायिकांची यात नावे असल्याची जोरदार चर्चा आहे. यामधील मोठ्या व्यावसायिकांची काही स्थानिक राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याचीही चर्चा आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील एकूण पाच ठिकाणांवर ही छापेमारीची धडक कारवाई सुरू असल्याचे दिसून येते. तब्बल २०० जणांची पथकं या कारवाईसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही फार मोठी कारवाई आज छत्रपती संभाजीनगर शहरात घडून येत आहे. याबाबत पुढील काही वेळात आयकर विभागाकडून अधिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com