Caste Census : "आता आरक्षणाचा कोटा..." केंद्र सरकारने जात जनगणनेस मंजुरी देताच जरांगे पाटलांनी केली मोठी मागणी

Caste Census India : केंद्र सरकारने बुधवारी (ता.30) जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. मागील अनेक दिवसांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात असताना काल मोदी सरकारने जातगणनेला मंजुरी दिली. काँग्रेससह विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Maratha Reservation Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 01 May : केंद्र सरकारने बुधवारी (ता.30) जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. मागील अनेक दिवसांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. अशातच काल मोदी सरकारने अचानक जातगणनेला मंजुरी दिली.

काँग्रेससह विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र, बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच सरकारने हा निर्णय घेतल्याची टीकाही आता केली जात आहे.अशातच आता केंद्राच्या या निर्णयावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

केंद्र सरकारचा हा निर्णय चांगला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय या जनगणनेमुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी केंद्राच्या जातगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकार जनगणना करतंय ही चांगली गोष्ट आहे.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Dhananjay Munde On Caste Census : मोदींचा ऐतिहासिक निर्णय अन् धनंजय मुंडेंनी काढली गोपीनाथरावांची आठवण!

इंग्रजांनी केलेली जनगणना केल्यानंतर जनगणना झालीच नव्हती. त्यामुळे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं ते म्हणाले. तर बाठिया आयोगाने नुकताच रिपोर्ट दिला आहे, त्या शिफारशी लागू केल्या तरी भागेल जनगणना करण्याची आवश्यकता नाही.

परंतु, सरकारची इच्छा असेल तर केली तरी हरकत नाही, असंही ते म्हणाले. मात्र, जो आयोग किंवा समिती गठीत केली जाईल, त्यातील लोक मात्र निपक्षपाती असावेत, नाहीतर फुगवून आकडा सांगितला जाईल अशी शंका व्यक्त करत या समितीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक असावेत आणि खरी संख्या समोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं गिफ्ट, आता मंत्रालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही...

तसंच यावेळी त्यांनी आरक्षणाची मर्यादा देखील वाढवावी असं म्हटलं आहे. ते म्हणाले, "आरक्षणाचा कोटा देखील सरकारने 72 टक्क्यांपर्यंत करायला पाहिजे. त्यामुळे आरक्षण सर्वांनाच पुरेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com