राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News: राज्यभर सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन तलाठी परीक्षेच्या सकाळी 9 च्या सत्रात सर्व्हर बंद पडल्याने परीक्षार्थींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांकडून एवढे शुल्क घेतले असतानाही परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या ढिसाळ कारभारावर राज्यभर संताप व्यक्त होत असतानाच आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत 'सर्व्हर डाऊन' प्रकाराची चौकशी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
याबाबत विखे यांनी सरकारने नेमलेल्या तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही. मात्र, परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच, यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानूसारच सुरळीत पार पडतील, अशी ग्वाही शिर्डीत माध्यमांशी बोलताना दिली.
तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता परीक्षा होऊ शकली नाही. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होण्याबाबत कळविण्यात आले.
टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११.०० वाजता राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रांवर सुरु करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्य समन्वयकांनी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना आणि त्याप्रमाणे सर्व परिक्षा केंद्रांवरील परिक्षार्थींना याची सूचना देण्यात आली होती, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी आज होणाऱ्या उर्वरीत दोनही सत्रातील परिक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी दिलगीरी व्यक्त करून, सदर सर्व्हर डाऊन घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत करणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार सुरळीत पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे विखे पाटलांनी सांगितले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.