Harshvardhan Jadhav Angry : सोन्यासारख्या मतदारसंघाची गटारगंगा केली, आता सोडणार नाही ; हर्षवर्धन जाधव भडकले..

Kannad Political News : करंजखेडसह तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अवैध दारू विक्री जोरात चालू असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
Harshvardhan Jadhav Angry
Harshvardhan Jadhav AngrySarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी लोकसभा लढवण्याची घोषणा, तर कधी मराठा आरक्षणासह खुल्या प्रवर्गासाठी २० टक्के आरक्षणाची मागणीसाठी. (Kannad News) आपली भूमिका मांडण्यासाठी ते सातत्याने समाज माध्यमांचा आधार घेत असतात. व्हिडिओ, पोस्ट करत आपली भूमिका सध्या ते आक्रमकपणे मांडतांना दिसत आहेत.

Harshvardhan Jadhav Angry
Jalna Loksabha Constituency : सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रावसाहेब दानवेंना पक्ष सहाव्यांदा उमेदवारी देणार ?

कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व स्व. रायभान जाधव, त्यांच्यानंतर पत्नी तेजस्वीनी जाधव यांनी केले. त्यानंतर दोन टर्म हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) या मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. (Shivsena) सध्या माजी आमदार असले तरी ते मतदारसंघात सक्रीय आहेत. शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न, पीकविमा, पीककर्ज यासह अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ते आक्रमक भूमिका घेतांना दिसतात.

परंतु आपले वडील स्व. रायभान जाधव यांनी सर्वांगीण विकासाने समृद्ध केलेल्या कन्नड-सोयगांव मतदारसंघाची गेल्या चार वर्षात सत्ताधाऱ्यांनी राखरांगोळी केली असा आरोप त्यांनी केला आहे. (Kannad) ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत हे सध्या विद्यमान आमदार आहेत. जाधव यांनी थेट त्यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख राजपूत यांच्याकडेच असल्याचे दिसते. हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत राजपूत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

कन्नड तालुक्यातील वासडीत असतांना करंजखेडसह तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अवैध दारू विक्री जोरात चालू असल्याचा आरोप जाधव यांनी केला. ज्या कन्नड-सोयगांव मतदारसंघात स्व. रायभान जाधव यांच्या काळात ठिबक सिंचन, कोईम्तूरच बेणं, इस्त्राईलची शेती याची चर्चा व्हायची, तिथे आता चपटी म्हणजे अवैध दारूची चर्चा होते. चारच वर्षात तुम्ही या मतदारसंघाची काय अवस्था करून ठेवली.

शंभर कोटींचा शेतकऱ्यांचा बुडालेली पीकविमा मी सरकारच्या घशात हात घालून बाहेर काढला आणि तुम्ही चपटीची भाषा करतायं. या मतदारसंघाची तुम्ही गटारगंगा करून ठेवली आहे, या पुढाऱ्यांना आता ठोकलं पाहिजे. मी लोकसभा लढवेन की विधानसभा ते पुढे पाहू, पण मतदारसंघात आणि गल्लीबोळात अवैध दारू विक्री केली जाणार असेल तर मी शांत बसणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला.

Harshvardhan Jadhav Angry
Parbhani BJP Politics : ठाकरे गटापासून दुरावलेल्या ब्राह्मण मतदारांवर भाजपचा डोळा...

मतदारसंघाची अवस्था पाहून आपल्याला वाईट वाटते, पण जे पुढारी याला जबादार आहेत, त्यांना सोडणार नाही, असा दमही हर्षवर्धन यांनी विरोधकांना भरला. गेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेनेच्या उदयसिंह राजपूत यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडी सरकार व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना राजपूत यांनी कन्नड मतदारसंघात अनेक विकासकामे केली.

परंतु शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या राजपूत यांना मतदारसंघाच्या विकासकामासाठी निधीच दिला जात नाही, असा आरोप स्वतः राजपूत यांनी केला होता. आता विधानसभेची निवडणूक वर्षभरावर आली असतांना जाधव यांनी आमदार राजपूत यांना लक्ष केल्याची चर्चा आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com