Paithan Assembly Constituency : संदीपान भुमरेंनी मुलासाठी मतदारसंघ सोडला, पण विजय सोपा नाही..

It is not easy for Bhumre to win in Paithan : एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने पैठणची जागा यावेळी प्रतिष्ठेची केली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंचे पैठण्याच्या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. भुमरे यांच्याविरोधात तक्रारी, आरोप करत ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार दत्ता गोर्डे यांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta GordeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Political News : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या विधानसभेच्या पैठण मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यात रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री राहिलेल्या संदीपान भुमरे यांनी मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून लोकसभा लढवली. पैठण विधानसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात संदीपान भुमरे यांची लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरमधून विजय मिळवला आणि दिल्ली गाठली.

पण आगामी विधानसभा निवडणुकीत मुलगा विलास बापू भुमरे याला उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत भुमरे पिता-पुत्रांना चांगलाच संघर्ष करावा लागणार असे चित्र आहे. (Sandipan Bhumre) महायुतीत सहाजिकच हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो. संदीपान भुमरे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते, त्यामुळे ते आपला दावा कदापी सोडणार नाहीत. पण महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांनी पैठण विधानसभा मतदारसंघावर दावा सांगायला सुरवात केली आहे.

यामुळे भुमरे पिता-पुत्रांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने पैठणची जागा यावेळी प्रतिष्ठेची केली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंचे पैठण्याच्या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. भुमरे यांच्याविरोधात तक्रारी, आरोप करत ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार दत्ता गोर्डे यांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भुमरे यांनी गोर्डे यांच्या आरोपांवर व त्यांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांचा हा निवडणूक स्टंट असल्याचे म्हटले आहे.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
MP Sandipan Bhumre : खासदार भुमरेंनी संसदेत पहिले भाषण वाचून केले, तरी टाळ्या मिळवल्या..

येत्या काळात या दोन प्रतिस्पर्धींमधील आरोप-प्रत्यारोप आणि कलगितुरा आणखी रंगण्याची शक्यता आहे. संदीपान भुमरे यांनी पैठण (Shivsena) विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभा निवडणुक लढवली होती. पैकी पाच वेळा ते विजयी झाले होते. त्याआधी शिवसेनेचे बबनराव वाघचौरे यांनी या मतदारसंघाचे एकदा प्रतिनिधित्व केले होते. आतापर्यंत सहा निवडणुकीत शिवसेनेने म्हणजेच सर्वाधिक काळ विजय मिळवलेला आहे.

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वाघचौरे यांनी भुमरेंचा पराभव केला होता. हा अपवाद वगळता पैठण कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्ष फुटीनंतर संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात मतदारसंघात रोष होता, पण दरम्यानच्या काळात कुठल्याच निवडणुका नसल्याने तो समोर आला नाही. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भुमरे यांनी आपले वर्चस्व तालुक्यात दाखवून दिले होते.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
Chhatrapati Sambhajinagar Shivsena UBT : लोकसभेतील पराभवाचा डाग ठाकरेंची सेना विधानसभेला धुवून टाकणार ?

तर मतदारसंघाबाहेरही आपण निवडून येऊ शकतो हे भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दाखवून दिले. महायुतीने मराठवाड्यातील आठ पैकी एकमेव संभाजीनगरची जागा जिंकली होती. त्यामुळे भुमरे यांच्या विजयाचे महत्वही वाढले. एवढ्या सगळ्या गोष्टी पथ्यावर पडल्या असताना पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास याला निवडून आणणे भुमरेंना फारसे अवघड नाही, असे बोलले जाते.

मात्र गेली पंचवीस-तीस वर्ष जो प्रतिसाद तालुक्यातील मतदारांनी भुमरेंना दिला, तोच त्यांच्या मुलाला मिळेल का? याबद्दल शंका उपस्थितीत केल्या जातात. दोघांच्या कार्यपद्धतीत, वागण्या-बोलण्यात फरक असल्याचे दिसून येते. शिवाय महायुतीतील घटक पक्षांकडून मतदारसंघावर दावे सांगितले जात असल्याने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठीही या बाप-लेकाला संघर्ष करावा लागणार असे दिसते.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
Marathwada News : मागील 40 वर्षांपासून आमच्यावर अन्याय..., महादेव कोळी समाजाने जरांगे-पाटलांसमोर मांडली व्यथा

मराठा आरक्षणाचा विषय अजून संपलेला नाही, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका येत्या 29 आॅगस्ट रोजी स्पष्ट होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या भागात पैठण विधानसभा मतदारसंघ येतो. गोदाकाठच्या अनेक गावांत मराठा आरक्षणाचा प्रभाव आहे. लोकसभेला संदीपान भुमरे यांना या मुद्याचा फायदा झाला, पण विधानसभेला परिस्थिती बदलणार आहे. या सगळ्याचा विचार केला तर भुमरेंना विधानसभा सोपी नाही, एवढे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com