MP Sandipan Bhumre : खासदार भुमरेंनी संसदेत पहिले भाषण वाचून केले, तरी टाळ्या मिळवल्या..

MP Sandipan Bhumre's First Speech : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या पाचोड गावातील ग्रामपंचायतीपासून राजकारणाला सुरवात करणारे संदीपान भुमर हे काही वक्ते म्हणून ओळखले जात नाहीत. मोकळा-ढाकळा स्वभाव, ग्रामीण भाषेत लोकांशी संवाद या जोरावरच त्यांनी पैठण विधानसभा मतदारसंघात सहा वेळा निवडणूक लढवली आणि पाच वेळा जिंकली.
MP Sandipan Bhumre
MP Sandipan Bhumre Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Shivsena News : गेल्या तीस वर्षापासून राजकारणात असलेले लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचे काल संसदेत पहिले भाषण झाले. अर्थात त्यांनी ते वाचून केले, तरी त्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी सहकारी खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या पाचोड गावातील ग्रामपंचायतीपासून राजकारणाला सुरवात करणारे संदीपान भुमर (Sandipan Bhumre) हे काही वक्ते म्हणून ओळखले जात नाहीत. मोकळा-ढाकळा स्वभाव, ग्रामीण भाषेत लोकांशी संवाद या जोरावरच त्यांनी पैठण विधानसभा मतदारसंघात सहा वेळा निवडणूक लढवली आणि पाच वेळा जिंकली.

पैठण येथील साखर कारखान्यात स्लीप बाॅय म्हणून काम करणारे भुमरे त्याच कारखान्याचे संचालक होतील, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल, पण ते झाले एवढेच नाही तर आता ते एका साखर कारखान्याचे मालक आहेत. राजकारणात नशिबाने साथ दिली, शिवसेने सारख्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेत काम करता करता तीस वर्ष भुमरे आमदार म्हणून पैठणमध्ये सत्ता गाजवत होते.

MP Sandipan Bhumre
MP Sandipan Bhumre : वाईन शाॅप नियमाने, शुल्क भरून घेतले ; आरोप करणारे खोटारडे..

आता पक्षाने त्यांना लोकसभेवर पाठवले आणि आता ते जिल्ह्याचे प्रश्न घेऊन संसदेत बोलणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात भुमरे यांना भाषणाची संधी मिळाली. (Shivsena) माझ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधि म्हणून मत्स्यपालन,पशुपालन व डेअरी मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवर आपले मत मांडण्यासाठी उभा आहे, अशी सुरवात भुमरे यांनी केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, रेणुका सहकारी साखर कारखाना, जिल्हा दुध उत्पादक संघाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या भुमरे यांच्याकडे राज्यात मंत्री असताना रोजगार हमी व फलोत्पादन खाते होते. शेतकऱ्यांशी निगडित या खात्याचा कारभार भुमरे यांनी आवडीने सांभाळला. आपल्यामुळे या दुर्लक्षित खात्याला भाव आला, ते नावारुपाला आले असा दावा भुमरे यांनी केला होता.

MP Sandipan Bhumre
Shivsena UBT : मातोश्रीवरील 'चौकडी' ठाकरेंना भेटू देईना ! ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात खटके

त्यामुळे आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी विविध मुद्यांवर जोर दिला. मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उपजिवीका मिळवण्यासाठी दुग्धव्यवसाय पुरक आहे.

मात्र या संबंधित सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी मराठवाड्यात स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भुमरे यांनी केली.

शुद्ध दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी व जनावरांचे संगोपन त्या संबंधी रोजगार वाढवण्यासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारल्यास संपूर्ण मराठवाड्याला त्याचा लाभ होईल.

तसेच मराठवाड्यात सर्वाधिक भेसळयुक्त दुधाची विक्री होते त्या वर राष्ट्रीय पातळीवरून कारवाई करावी, अशी विनंती भुमरे यांनी कृषी मंत्र्यांकडे आपल्या भाषणात केली. बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानत भुमरे यांनी वाचून केलेले भाषण संपवले.

आपण निवडून दिलेला खासदार संसदेत भाषण करतो याचा त्यांच्या समर्थकांना निश्चितच आनंद झाला असणार. आता पुढील पाच वर्ष ते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील किती प्रश्न लोकसभेत मांडता आणि किती सोडवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com