Parbhani Thackeray Group: परभणीत `खाना`कडेच बाण; चिन्हाशिवाय ठाकरेंच्या सेनेची कसोटी...

Shivsena UBT : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्यातील जनतेने निसंकोचपणे हिंदुत्वाची बाजू घेतली.
Parbhani Shivsena News
Parbhani Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे आजवरच्या निवडणुका निकालावरून सिद्ध होते. तसेच जिल्ह्यातील जनतेने पक्ष सोडलेल्या नेत्यांना पुन्हा कधीच निवडून दिले नाही हा आजवरचा राजकीय इतिहास आहे. (Shivsena News) शिवसेनेचे पहिले खासदार स्व. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर यांनी शिवसेना सोडली व त्यानंतर अनेकदा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावले.

Parbhani Shivsena News
Raju Shetti On Maratha Reservation: मराठा आरक्षणात काही झारीतील शुक्राचार्यांचा अडसर; शेट्टींचा आरोप...

मात्र, जिल्ह्यातील जनतेने त्यांना पुन्हा कधीच निवडून दिले नाही. कदाचित यामुळेच शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) व परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिंदे गटात न जाता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. (Parbhani) शिवसेनेतील बंडानंतर राज्य निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. ठाकरे गटाला ही सर्वात मोठी अडचण ठरणार आहे.

तसेच आजपर्यंतच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप युती असल्याने भाजपच्या पारंपरिक मतांचा लाभ शिवसेनेच्या उमेदवाराला होत असे. विशेषतः लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा लाभ शिवसेनेच्या उमेदवाराला झाल्याचे स्पष्ट आहे. (Marathwada) या मुद्द्यावरूनच परभणी येथे रेल्वे सुशोभीकरण कार्यक्रमात खासदार संजय जाधव व भाजपचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

भरोसे यांनी सांगितले की, मोदी लाटेमुळे संजय जाधव निवडून आले. या वक्तव्याच्या समाचार घेत जाधव यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, २०२४ मध्ये आम्ही मोदी लाटेशिवाय निवडून येऊन दाखवू. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आता भाजपऐवजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे सहकार्य घ्यावे लागणार आहे.

विशेषतः महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकावर अन्याय होत असल्याची जाहीर तक्रार राज्यात सर्वप्रथम खासदार जाधव यांनी केली होती. या कारणामुळेच त्यांनी पक्षप्रमुखांकडे खासदारकीचा राजीनामाही सोपवला होता. बदलत्या परिस्थितीत आता त्यांचीच मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्यातील जनतेने निसंकोचपणे हिंदुत्वाची बाजू घेतली होती. त्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराचे सूत्र ही `खान हवा की बाण` हेच असायचे.

Parbhani Shivsena News
Tanaji Sawant Visit Protester : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का ? आंदोलकांचा सावंतांना सवाल...

मात्र, सध्या सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. पाथरी येथील सईद खान यांची शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. परभणी व मुंबई येथे त्यांनी मोठे कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यात तरी खानाकडेच बाण आला असल्याने `खान की बाण` हे सूत्र निष्प्रभ ठरणार आहे. जिल्ह्यातील खासदार व आमदार हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने शिवसेनेतील प्रस्थापित नेत्यांनी शिंदे गटात जाणे टाळले.

माजी खासदार सुरेश जाधव यांच्याकडे निवडणूक जिंकण्याचा अनुभव असला तरी त्यांनी मधल्या काळात ते अनेक पक्षांत फिरून आल्याने शिवसैनिकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच पक्ष संघटनेत कार्य करताना सुरेश जाधव, परभणी महानगर अध्यक्ष प्रवीण देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे सईद खान या सर्वांची `एकला चलो रे`ची भूमिका असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सर्वमान्य नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com