Jaiprakash Mundada joins Shiv Sena : ठाकरेंनी लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्याने नाराज जयप्रकाश मुंदडांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Jaiprakash Mundada on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अजूनही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देत नाही, भेट देत नाही वर्षभर प्रतीक्षा करूनही त्यांच्याशी चर्चा करत नाही, असा आरोप मुंदडा यांनी केला आहे.
Jaiprakash Mundada
Jaiprakash MundadaSarkarnama

Jaiprakash Mundada and Hingoli Shivsena नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले शिवसेना ठाकरे गटाचे वसमतचे माजी आमदार तथा सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हे इच्छुक होते.

मात्र तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही माझी मजबुरी आहे, असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी नाकारली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ठाकरेंनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने तयारी म्हणून मुंदडा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरेंना धक्का दिला आहे.

नुकताच जयप्रकाश मुंदडा यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यानंतर लवकरच वसमतमध्ये मोठा मेळावा घेऊन भव्य प्रवेश सोहळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना वसमतचे शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा(Jaiprakash Mundada) हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते. या मतदारसंघातून त्यांनी चार वेळा विजय मिळवत प्रतिनिधित्व केले आहे.

Jaiprakash Mundada
Ambadas Danve : अंबादास दानवे असं काय बोलले की खैरेंचा चेहरा पारच उतरला...

शिवसेनेत फूट पडल्यानंतरही मुंदडा हे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहिले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मुंदडा यांना पक्षाने यावेळी उमेदवारी नाकारली. यानंतर उद्धव ठाकरे अजूनही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देत नाही, भेट देत नाही वर्षभर प्रतीक्षा करूनही त्यांच्याशी चर्चा करत नाही, असा आरोप करत जयप्रकाश मुंदडा व त्यांच्या समर्थकांनी अखेर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत जयप्रकाश मुंदडा यांनी मशाल ऐवजी धनुष्यबाण हाती घेतला आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता किंवा कुठलीही बैठक न घेता तो ठरवण्यात आल्याचा आरोपही मुंदडा यांनी केला.

Jaiprakash Mundada
Pratap Patil Chikhlikar : 'नांदेडमध्ये पराभव माझा झाला; पण नाचक्की भाजप अन्‌ अशोक चव्हाणांची झाली...!'

आपण पक्षाकडे दोन वेळा लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी आपली मजबुरी असल्याचे सांगत मला उमेदवारी नाकारली. पण त्यांची मजबुरी काय होती? हे त्यांनी शेवटपर्यंत सांगितले नसल्याचे मुंदडा यांनी म्हटले आहे.

हिंगोली लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाने दणदणीत विजय मिळवल्यानंतरही पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबत नाहीये. जयप्रकाश मुंदडा यांचा वसमत विधानसभा मतदारसंघात व हिंगोली जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे वसमत विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अडचण होऊ शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com