Congress MP Kalyan Kale : काँग्रेस खासदाराची सहल ठरली थरारक! दुबईत क्षेपणास्त्रांचा वर्षाव, कल्याण काळे सुरक्षित पण तणावात!

Jalna Congress MP Kalyan Kale Stuck in Dubai Amid Iran-US-Israel War Crisis : पश्चिम आशियातील इराण-इस्त्रायल युद्धामुळे, मित्रांसह सहलीला गेलेले जालना इथले काँग्रेस खासदार कल्याण काळे दुबईत अडकून पडले आहेत.
Congress MP Kalyan Kale 1
Congress MP Kalyan Kale 1Sarkaranama
Published on
Updated on

Jalna Congress MP : पश्चिम आशियामध्ये युद्धाची तीव्रता वाढू लागली आहे. अमेरिका-इस्त्रायलने इराणविरोधात अंतिम युद्ध छेडले आहे. नाटोसह 11 देशांनी इराणविरोधात उडी घेतल्याने या युद्धाची भीषणता अधिक वाढणार अन् त्याची झळ जगभर पोहोचणार अशी स्थिती आहे.

या युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतूक ठप्प झाली असून, भारतील अनेक जण अडकून पडले आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दुबईत अडकून पडली असतानाच, आता जालना इथले काँग्रेस खासदार कल्याण काळे हे दुबईत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

युद्धामुळे आखाती देशातील विमानसेवा बंद झाली आहे. या मुळे अनेक भारतीय आखाती देशात अडकून पडले आहे. जालन्याचे (Jalna) खासदार कल्याण काळे हे देखील दुबईत अकडून पडल्याची माहिती समोर आली आहे. दुबईमध्ये त्यांच्यासोबत अडकलेल्या व्यक्तींची संख्या नऊ असून सर्वजण सुरक्षित आहे. हे सर्व जण आपापल्या नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेस (Congress) खासदार डॉ. कल्याण काळे त्यांच्या वर्गमित्रासह दुबई आणि अबू धाबी इथं सहलीला गेले होते. ते परतण्याच्या तयारीत असताना युद्धामुळे सर्व विमाने बंदची घोषणा झाली अन् ते त्यांचे वर्गमित्र अबू धाबी इथं अकडून पडले. डॉ. काळे यांच्या समवेत त्यांचे मित्र आहेत. ते कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे त्यांचे बंधू जग्गनाथ काळे यांनी सांगितले.

Congress MP Kalyan Kale 1
Sangram Jagtap controversial statement : दिवाळीला खरेदी हिंदूंकडून, आता रिक्षावालाही हिंदूच? जगतापांच्या विधानाने पुन्हा पेटला वाद

याशिवाय छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी तिघे, हिंगोली जिल्ह्यातील एक दुबईमध्ये तर जालन्यातील तिघे अबू धाबी इथं अडकले आहेत. लातूर जिल्ह्यातील सहा, बीडमधील दोघे तर नांदेडमधील 11 जण मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये अडकून पडले आहेत.

Congress MP Kalyan Kale 1
PV Sindhu Dubai experience : डोक्यावरून क्षेपणास्त्रांचे आवाज, विमानतळाजवळ स्फोट; दुबईतील भीषण क्षणांचा बॅडमिंटनपटू सिंधूचा थरारक अनुभव!

आखाती देशात अडकलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनास कळवावी, असे आवाहन करण्यात आलं आहे. ही माहिती देताना, पारपत्रातील (पासपोर्ट) नाव , पारपत्र क्रमांक, त्याची प्रत्र, छायाचित्र, व्हाॅटस् ॲप क्रमांक, ई-मेल, आखाती देशातील, दुबईतील सध्याचे ठिकाण, हॉटेल, संपूर्ण पत्ता, जीपीएस निर्देशांक, अडकण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करावे, असे म्हटले आहे.

तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, पासपोर्ट हरवणे, उड्डाण रद्द होणे, प्रादेशिक परिस्थिती हेही कळावे. याशिवाय व्हिसाचा तपशील व त्याचा अंतिम दिनांकाचा तपशील कळवावा असे म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना देत आहेत, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com