Heavy Rain Fund Scam News : तहसीलदारांचा पासवर्ड वापरून शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला! तलाठी, मंडळ अधिकारी कृषी सहायकांची चौकशी सुरू

In Jalna farmers affected by rains and hailstorms was allegedly misappropriated by gramsevaks and officials in a subsidy scam. अनुदानातील कोट्यावधी रुपये तलाठी , ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी हडप केल्याची चर्चा आहे.
Heavy Rain Fund Scam News
Heavy Rain Fund Scam NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदानापैकी काही कोटी रुपये अनुदान तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी हडप केल्याचा आरोप केला जात आहे. सगळ्यात गंभीर प्रकारण म्हणजे तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून हा घोटाळा करण्यात आला आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीतून ही बाब उघडकीस आली आहे.

2022-24 मध्ये जिल्ह्यात (Heavy Rain) अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देखील मंजूर करण्यात आले होते. मात्र, या अनुदानातील कोट्यावधी रुपये तलाठी , ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी हडप केल्याची बाब उघड झाली आहे. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पिक अनुदानाच्या बाबतीत काही तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे आणि नायब तहसीलदार लुणावत आदींची त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली. (Jalna) अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 75 ते 80 गावांच्या तलाठ्यांनी अपलोड केलेल्या याद्याची फेरतपासणी ही समिती करत आहे.

Heavy Rain Fund Scam News
Farmer Debt Crisis : कर्जमुक्तीची घोषणा; अवघड जागेचे दुखणे!

दरम्यान, प्राथमिक चौकशीतून बोगस शेतकरी दाखवून याद्या जोडून अनुदान उचलण्यात आल्याचे समोर आले आहे. घनसावंगी, अंबड, जाफराबाद व भोकरदन तालुक्यात बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या नावावर पैसे वळते केले व नंतर काढून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यातील गावांची चौकशी सुरू आहे. अंबडची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. 10 ते 12 गावे आणखी बाकी आहेत. पुढील पंधरा दिवसात सर्व चौकशी पूर्ण होईल. त्यानंतरच या विषयी माहिती जिल्हाधिकारी देतील, असे चौकशी समिती सदस्य मनीषा दांडगे यांनी सांगितले.

Heavy Rain Fund Scam News
Uddhav Thackeray : 'योजनांची अतिवृष्टी पण अंमलबजावणीचा दुष्काळ', उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पिक अनुदानाच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये लक्षात आले की काही ठिकाणी डुप्लिकेशन, बोगस याद्या जोडून अनुदान उचलण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती ज्यांनी याद्या अपलोड केल्या आहेत. अशा 75 ते 80 गावातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहायकांना चौकशीसाठी बोलावून त्याची फेरतपासणी ते असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com