Ex-MLA Narayan Munde Suspended : पक्षविरोधी काम केल्याचा ठपका, माजी आमदार नारायण मुंडेंसह मुलाची काँग्रेसमधून हकालपट्टी..

Big action of Maharashtra Congress Former MLA Narayanarao Munde suspended for 6 years : जालन्यात काँग्रेसने यश मिळवले असले तरी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेत्यांनी पक्षविरोधात काम केल्याचा अहवाल समोर आला आहे.
Narayan Munde
Narayan MundeSarkarnama
Published on
Updated on

Jalana Political News : लोकसभेच्या जालना मतदारसंघातून महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे लाखाच्यावर मताधिक्य घेऊन विजयी झाले. मराठा आरक्षण आंदोलन आणि माजी मंत्री तथा पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात असलेली नाराजी याचा फायदा काँग्रेसला झाला. जालन्यात काँग्रेसने यश मिळवले असले तरी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेत्यांनी पक्षविरोधात काम केल्याचा अहवाल समोर आला आहे.

त्यानूसार पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत माजी आमदार नारायण मुंडे आणि त्यांचे चिरंजीव प्रा. सत्संग मुंडे यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आदेशाने सहा वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीने बुधवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जालना शहर- जिल्हाध्यक्ष शेख महेमूद यांनी कळविले आहे.

काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या इंडिया आघाडीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा समावेश होता. राज्यात काँग्रेससह (Congress) हे तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले होते. तीनही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झोकून देत महाविकास आघाडीचे काम केले.

Narayan Munde
Bajrang Sonwane on Manoj Jarange : 'जरांगेंच्या उपोषणाची दखल घेण्याची सरकारला सूचना करा' ; बजरंग सोनवणेंची राज्यपालांकडे मागणी!

याचा परिणाम मराठवाड्यातील आठ पैकी सात लोकसभेच्या मतदारसंघात दिसून आला. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवले. निवडणूक निकालानंतर सर्व लोकसभा मतदार संघांतील यश-अपयशाचे परिक्षण पक्षाच्या वतीने केले जात आहे. या निवडणुकीत कोणी पक्षाचे काम केले, कोणी विरोधात काम केले याचा सविस्तर अहवाल त्या त्या ठिकाणांवरुन पक्षश्रेष्ठीकडे देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेसने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. याच अनुषंगाने जालना जिल्ह्यातील माजी आमदार नारायण मुंडे आणि त्यांचे पुत्र प्रा. संत्सग मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पिता पुत्राची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Narayan Munde
Manoj Jarange Patil : खासदार बजरंग सोनवणेंनी पुन्हा घेतली मनोज जरांगेंची भेट, 'सर्व खासदारांना एकत्र करणार...'

याबाबतचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीने या दोघांच्या हकालपट्टीचे पत्र जारी करण्यात आले आहे, शेख महेमूद यांनी कळविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई म्हणजे काँग्रेसमध्ये राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com