Manoj Jarange Patil : खासदार बजरंग सोनवणेंनी पुन्हा घेतली मनोज जरांगेंची भेट, 'सर्व खासदारांना एकत्र करणार...'

Bajrang Sonwane meet Manoj Jarang maratha reservation : परभणीचे खासदार संजय जाधव यांनी थेट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देत मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र लिहिले.
Bajrang Sonwane meet Manoj Jarang
Bajrang Sonwane meet Manoj Jarang sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारने करावी या मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. आज (गुरुवार) त्यांच्या उपोषणााच सहावा दिवस आहे. पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नवनिर्वाचित खासदार, नेते त्यांची भेट घेत आहे.

बीडचे नननिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी बुधवारी मध्यरात्री दुसऱ्यांदा मनोज जरांगे यांची भेट घेतली. निवडणुकीच्या निकाला जाहीर झाल्यानंतर सोनवणे यांनी जरांगे पहिल्यांदा भेट घेतली होती.

मनोज जरांगे Manoj jarange यांच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना एकत्र करून राज्यपालांना भेटणार असल्याच देखील बजरंग सोनवणे यांनी 'साम' टीव्हीशी बोलताना सांगितले. मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. बुधवारी (ता.12) त्यांनी थेट मुख्यमंत्र्‍यांच्या ओसडीवर आरोप करत सरकारला इशारा दिला होत.

Bajrang Sonwane meet Manoj Jarang
BJP Vs MNS : 'मनसेमुळे महायुतीला काहीच फायदा नाही,आता त्यांना एकही जागा मिळणार नाही!'; भाजप आमदारानं ठणकावलं

दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी थेट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देत मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र लिहिले. धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर Omraje Nimbalkar यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे-पाटील यांनी हा लढा लढताना स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Bajrang Sonwane meet Manoj Jarang
Amol Mitkari Vs Bajrang Sonwane : 'बाप्पा, दादांनी मला ऑपरेटर बनवलं तर मी..' ; मिटकरींनी सोनवणेंना पुन्हा डिवचलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com