Jalna Loksabha Constituency : परदेशात शिकणारा नातू रावसाहेब दानवेंच्या प्रचारात उतरला..

Raosaheb Danve : उमेदवाराचे कुटुंबही त्यांच्याबरोबरीने प्रचारात सहभागी होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.
Raosahb Danve
Raosahb DanveSarkarnama

Jalana Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या मराठवाड्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्पातील प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार त्यांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तर उन्हातान्हात गावोगावी प्रचार करत आहेत. पण उमेदवाराचे कुटुंबही त्यांच्याबरोबरीने प्रचारात सहभागी होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे Raosaheb Danve लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.

महाविकास आघाडीच्या डॉ कल्याण काळे Kalyan Kale यांच्याशी त्यांची थेट लढत होत आहे. पण कुठलीही निवडणूक हलक्यात न घेणाऱ्या दानवे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत दुसरी फेरी सुरू केली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य कुठल्या न कुठल्या सभा, कॉर्नर बैठका किंवा पदयात्रेत सहभागी होताना दिसत आहे. यात एक चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे आणि तो म्हणजे रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पांडे Shivam Pande यांचा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosahb Danve
Lok Sabha Election 2024 : आमदार म्हणतायेत, "मला 'खासदार' झाल्यासारखं वाटतंय!"

उच्चशिक्षित आणि विदेशात शिकणाऱ्या शिवमने आजोबांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि तो खेडोपाडी, गाव, तांड्यावर आणि शहरी भागात घरोघरी जाऊन आजोंबाचा प्रचार करताना दिसत आहे. राज्यात बड्या नेत्यांच्या मुलांचा किंवा नातेवाईकांचा प्रचारातील सहभाग हा नेहमची चर्चेचा विषय ठरत असतो. बारामतीत सुप्रिया सुळे यांची लेक, सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांचे चिरंजीव पार्थ पवार Parth Pawar अशी काही नावे सध्या समोर येत आहेत.

त्यात फारसा राजकारणात सक्रिय नसलेला पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आजोबांच्या प्रचारात सक्रिय झालेला लक्षवेधी चेहरा म्हणजे शिवम पांडे. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी निर्मला दानवे, आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे हे सक्रीय राजकारणात असल्यामुळे त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे. Loksabha Election 2024

त्यात दानवे यांचा नातू शिवम पांडे हादेखील हिरिरीने सहभागी होताना दिसत आहे. शिवम मुकेश पांडे हा रावसाहेबांच्या मोठ्या कन्या आशा पांडे यांचा मुलगा आहे. तो राजकारणापासून अलिप्त असून त्याने शिक्षण छत्रपती संभाजीनगर, पुणे व उच्च शिक्षण परदेशात घेतले आहे. इन्व्हेस्टमेंट बँकर अशी त्याची ओळख असून शिवार्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहरात त्याने काही वर्षांपूर्वी सामाजिक उपक्रमदेखील सुरू केले होते. सध्या शिवम इन्फ्रास्ट्रक्चर व इन्व्हेस्टमेंट व्यवसायात कार्यरत आहे.

उद्योजक, व्यावसायिक आणि विशेषतः तरुणांमध्ये शिवमचा चांगला संपर्क आहे. या संपर्काचा उपयोग मतदारसंघात आजोबांच्या प्रचारासाठी शिवम करतांना दिसत आहे. शिवम पांडे याने छत्रपती संभाजीनगर शहरात घरोघरी जाऊन रावसाहेब दानवे व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो असलेले कॅलेंडरचे वाटप करत प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे या कॅलेंडरमध्ये अयोध्येतील राम मंदिर व श्रीराम यांच्या प्रतिमा असल्याने मतदार ते मनोभावे स्वीकारत आहेत.

Raosahb Danve
Sharad Pawar News : नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला; पवारांचा जोरदार टोला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com