Kolhapur News : जर इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर पाच वर्षांमध्ये पाच पंतप्रधान असं धोरण आघाडीचं आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील प्रचारसभेत केला होता.
मोदींच्या याच विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. इंडिया आघाडीत अजूनही पंतप्रधान पदाबाबत कसलीही चर्चा झालेली नसताना मोदींनी पाच वर्षात पाच पंतप्रधान हा जावई शोध कुठून लावला? असा चिमटा पवारांनी काढला. (Latest Marathi News)
सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडीने एक धोरण तयार केले आहे. दरवर्षी नवा पंतप्रधान देऊन पाच वर्षात पाच पंतप्रधान, अशी सत्तेची वाटणी त्यांनी केली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावरुन मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
आता याचा विधानावर शरद पवारांनी टोला लगावला. तसेच पंतप्रधान पदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ असल्यानंतरच योग्य त्या नेत्याची या पदासाठी निवड केली जाईल, असेही पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्याची निवडणूक एका टप्प्यात होते. एका टप्प्यात येथे मतदान झालं. मग महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं कारण काय? याचा अर्थच असा की सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे मोदी (Narendra Modi) वारंवार राज्यात कसे येतील याची काळजी घेण्यात आली आहे, अशा शब्दात शरद पवारांनी आयोगावरही निशाणा साधला.
इथेले स्थानिक नेते जे काही त्यांना भाषणाची स्क्रिप्ट लिहून देतात, त्या स्क्रिप्टनुसार ते बोलत राहतात. लिहून दिल्यानुसार ते भाषणाची सुरुवात करतात, अशी टीकाही पवार (Sharad Pawar) यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.