Jalna Loksabha Constituency : रावसाहेब दानवेंचा प्रचाराचा फंडाच न्यारा; म्हणाले, 'कार्यकर्त्यांनो, मी निवडून आलो तर...'

Loksabha Election 2024 News : जोपर्यंत माझ्याकडे पद, सत्ता आहे तोपर्यंत तुम्हाला पण तेवढीच किंमत आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी एकट्याची नाही, तर तुमच्या सर्वांची आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

Jalna News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार आपल्या विजयासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण शैली आणि मुद्दा पटवून देण्यासाठी चपखल उदाहरणं देण्यासाठी ओळखले जातात. निवडणुकीचा माहौल म्हटल्यावर तर दानवे यांच्या या कलेला चांगलाच बहर येतो.

तर मतदारसंघातील एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व कोणामुळे? हे पटवून देताना भन्नाट किस्सा सांगितला. यातून त्यांनी कार्यकर्ता नेत्यासाठी आणि नेता कार्यकर्त्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे पटवून दिले. तुम्ही आहात, म्हणून मी आहे. तुमच्यामुळे मला आणि माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे. मी निवडून आलो तर तुमची किंमत राहील, असे सांगत यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चांगलेच चार्ज केले. (Jalna Loksabha Constituency)

Raosaheb Danve
Market Committee News : 'मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत एक चौरस फूटही FSI वापरलेला नाही'; संचालकांचा दावा!

मी कुठलीच निवडणूक हलक्यात घेत नसतो, तुम्ही पण गाफील राहू नका, असे आवाहन करत दानवे यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषण जसजसे रंगत होते, तसे कार्यकर्ते कान लावून ऐकत होते. नेत्यासाठी कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी नेता किती महत्त्वाचा असतो हे पटवून देण्यासाठी मग दानवेंनी खास आपल्या शैलीत एक किस्सा सांगितला.

एका खेडेगावातील सद्ग्रहस्थाला गावातील लोक अगदीच आदराने प्रत्येक कार्यक्रम, लग्नसमारंभ, उत्सवात बोलावून मानपान देत असत. प्रत्येक वेळी या गृहस्थांसोबत त्यांच्या पत्नीला निमंत्रित करून त्यांनाही तोच आदर आणि मान सन्मान दिला जायचा. दररोज गावातील कोणाच्या तरी घरी या गृहस्थाला सपत्नीक जेवणाचे आमंत्रण असायचे. पण या गृहस्थाच्या पत्नीचा समज असा होऊन बसला की हा मान सन्मान तिला पतीमुळे नाही, तर स्वतःमुळेच मिळतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय जेवायला गेल्यानंतर जेवणाला नाव ठेवणे, चुका काढणे असा प्रकार त्या महिलेकडून सुरू असायचा. पतीने अनेकदा समजूत काढण्याचा, अन्नाला नाव न ठेवण्याचा सल्ला पत्नीला दिला, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायची. पतीने माझ्यामुळे तुला हा सन्मान मिळतो हे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही ते पटले नाही. मग एकदिवस अचानक या गृहस्थाचे निधन झाले. त्यानंतर या महिलेला गावात कुणीही बोलवेनासे झाले आणि तिला पतीने सांगितलेली गोष्ट पटली.(Loksabha Election 2024)

ही गोष्ट सांगितल्यावर दानवेंनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडे चोहोबाजूंनी नजर फिरवली, यांना काही कळालं का? याचा अंदाज घेतला. यावर ते म्हणाले, कार्यकर्त्यांनो तुम्ही लक्षात ठेवा निवडणूक पद सत्ता हे तसेच आहे. जोपर्यंत माझ्याकडे पद, सत्ता आहे तोपर्यंत तुम्हाला पण तेवढीच किंमत आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी एकट्याची नाही, तर तुमच्या सर्वांची आहे. यावर उपस्थितांना दानवेंना नेमकं काय सांगायचं हे लक्षात आलं आणि आपला नेता किती हुशार आहे, याची प्रचिती पुन्हा आली.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Raosaheb Danve
Parbhani Lok Sabha News: परभणीत धनुष्यबाण 35, तर घड्याळ 25 वर्षांनंतर निवडणुकीतून गायब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com