औरंगाबाद : संभाजीनगर करण्याची गरज काय? आम्ही ते आधीच केले, आम्ही संभाजीनगरच म्हणतो, असे म्हणत मुंबईतील जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद शहराच्या नामकरण विषयाला हात घातला. (Aunragabad) पण यावरून भाजपने ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. (Shivsena) देवेंद्र फडणवीस यांनी तर आता संभाजीनगर विसरा, भाजप सरकार येईपर्यंत ते होणार नाही, असा टोला लगावत शिवसेनेला डिवचले. आता ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यानेच संभाजीगरचा विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावरच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री व राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच हा खुलासा केला आहे. एकीकडे औरंगाबादचे संभाजीगनर करणारच म्हणणारी शिवसेना तर दुसरीकडे याच सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीकडून हा विषयच सरकारच्या विचाराधीन नसल्याचे सांगणे यावरून नामांतराच्या प्रश्नावर शिवसेना फक्त राजकारणच करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Marathwada)
औरंगाबादेत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांना औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रंगल्याबद्दल विचारले. यावर संभाजीगनरचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
टोपे म्हणाले, राज्यात महागाई, बेरोजगारी, पाणी, वीज, शेतकऱ्यांचे व इतर विकासाचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवून सर्वसामान्य जनतेला दिलासा कसा देता येईल, यावर सरकारने आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार हा विषयच सरकारच्या डोक्यात सध्या नाही. मुंबईच्या हिंदी भाषी महासंकल्प सभेत बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व्हा बहिरे म्हणत, आता संभाजीनगर विसरा, असा टोला लगावला होता.
यावर प्रत्युत्तर देतांना खैरे यांनी सरकारी पातळीवर संभाजीनगर करण्याची कागदोपत्री पुर्तता करण्यात आली असल्याचे आणि या शहराचे नाव लवकरच अधिकृतपणे संभाजीनगर होणार असल्याचा दावा केला होता. परंतु टोपे यांच्या या विधानानंतर खैरे खोट सांगत आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.