Jalna Municipal Corporation Election News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेपाठोपाठ जालन्यातही शिवसेना-भाजप युती तुटली आहे. राज्य पातळीवर ठरवण्यात आलेल्या सुत्रात ही युती बसत नसल्याने भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर केलं. गेल्या दीड-दोन महिन्यापासून जालन्या युतीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात होते. नुसतं पत्र देऊन युती होत नसते, असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली होती. कालपर्यंत दोन्ही बाजूचे नेते हे आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत, आमचा फाॅर्म्युला ठरला आहे असा दावा करत होते.
नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झालेल्या जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजप युती बिनसली आहे. आता हे दोन्ही पक्ष स्वबळावर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहे. आज सकाळपर्यंत युतीसाठी शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. दोन-तास शिल्लक असेपर्यंत युती होणार असे सांगणाऱ्या नेत्यांनी आता आम्ही स्वबळावर लढणार असे जाहीर केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युती-आघाडीसाठी नेत्यांनी ताणल्यामुळे कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये आता नेत्यांबद्दल मोठा रोष असल्याचे पहायला मिळाले आहे. जालना महापालिकेत सुरवातीपासून युती नको, अशी भूमिका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली होती. परंतु राज्य पातळीवर युती करा, असा संदेश आल्याने गेल्या आठवडाभरापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. अखेर जास्त ताणल्यामुळे अखेर तुटले. अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक युतीत असल्याने महापालिकेत एकत्र येणे शक्य नसल्याचा अंदाज आला होता.
जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याची घोषणा बबनराव लोणीकर यांनी केली आहे. राज्याच्या धोरणांच्या सुत्रामध्ये ही युती बसत नसल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे लोणीकर म्हणाले. भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागेवरून वाद होता. त्यामुळे महायुतीत ठिकाणी पडली होती. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय मतभेदही युती तुटण्यास कारणीभूत असल्याचे आता बोलले जात आहे.
युतीवर एकमत होऊ शकत नाही याची जाणीव दोन्ही पक्षांना झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू केली होती. अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. कैलास गोरंट्याल यांनी सुरूवातीपासून अर्जुन खोतकर यांच्यावर अविश्वास दाखवत गद्दारी करणार नाही याची शाश्वती द्या, धमकीची भाषा नको, शिवसेनेने महापौर पदाचा उमेदवार आधीच जाहीर केला त्याचे काय? असे प्रश्न उपस्थित केले होते.
अर्जुन खोतकर यांनीही गोरंट्याल याच्या पत्नी आणि मुलाच्या प्रभागांवरच दावा सांगितल्याचे बोलले जाते. यातून निर्माण झालेल्या तानातानीतून अखेर युती तुटल्याचा दावा केला जात आहे. युती तुटल्याचा फटका आता नेमका कोणाला बसतो? याचा फायदा काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळतो का? दोन्ही पक्षात बंडखोरी होते, की आता सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या दोन दिवसात मिळणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.