Jalna Election: शिवसेना-भाजप स्वबळावर लढले, पण जालन्याच्या मतदारांची पसंती युतीलाच! रावसाहेब दानवे म्हणतात...

Jalna Municipal Election : जालना महापालिकेत शिवसेना-भाजप स्वबळावर लढले असले तरी मतदारांची पसंती महायुतीलाच मिळाल्याचे चित्र असून, भाजप सर्वाधिक जागांसह पहिला महापौर देण्याच्या दिशेने आहे.
BJP and Shiv Sena leaders addressing supporters during Jalna Municipal Election, as early trends suggest Mahayuti dominance and BJP leading in seat tally.
BJP and Shiv Sena leaders addressing supporters during Jalna Municipal Election, as early trends suggest Mahayuti dominance and BJP leading in seat tally.Sarkarnama
Published on
Updated on

Jalna Mahayuti News : जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी युती तोडत स्वबळासाठी दंड थोटपटले. जागा वाटपावरून शेवटपर्यंत तानातानी झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. मतदारांनी मात्र आजच्या मतदानात शिवसेना-भाजप या महायुतीतील पक्षांनाच पसंती दिल्याचा अंदाज आहे.

सर्वाधिक 28 जागांसह भाजप जालना महापालिकेत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांमधील उत्साह पाहता भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्याचा पहिला महापौर भाजपचाच होईल असा दावा केला होता. साम टीव्हीने केलेल्या एक्झीट पोलमध्ये त्यांचा हा दावा खरा होताना दिसतो आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त दोन जागा मिळू शकतात. बहुमताचा आकडा शिवसेना-भाजप सहज गाठताना दिसत आहे. महाविकास आघाडीची गाडी दहा जांगावरच थांबण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष एक जागा जिंकून खाते उघडू शकते. तर जालना लोकसभा मतदारसंघात विजय मिळवत खासदार झालेल्या कल्याण काळे यांच्या काँग्रेस पक्षालाही 7 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

BJP and Shiv Sena leaders addressing supporters during Jalna Municipal Election, as early trends suggest Mahayuti dominance and BJP leading in seat tally.
Chhatrapati Sambhajinagar Election: धक्कादायक! मतदारांची यादी तयार करून थेट पैशांचीच डील, अलर्ट नागरिकांनी डाव हाणून पाडला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 2, एमआयएम 1 तर 2 जागा या अपक्षांच्या खात्यात जातांना दिसत आहेत. एकूणच जालना महापालिकेत शिवसेनेसोबत युती न करण्याचा भाजपचा निर्णय फायदेशीर ठरताना दिसतो आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी निवडणुकीआधी भाजपमध्ये केलेला प्रवेशही भाजपसाठी महापालिकेत बळ देणारा ठरत आहे.

BJP and Shiv Sena leaders addressing supporters during Jalna Municipal Election, as early trends suggest Mahayuti dominance and BJP leading in seat tally.
Beed NagarPalika : बीडमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला; योगेश क्षीरसागरांना जाहीरपणे नडलेला नेता उपनगराध्यक्षपदी विराजमान!

स्वबळावर लढलेल्या शिवसेना-भाजपला सत्तेसाठी मात्र एकत्र यावे लागणार आहे. ज्याचे नगरसेवक जास्त त्या पक्षाचा महापौर हा फाॅर्म्युला स्वीकारला तर रावसाहेब दानवे यांनी केलेला दावा खरा ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com