Mumbai News: माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला चक्क लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या कृत्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उडत आहे.
एका माजी मंत्र्यांने अशा प्रकारे कार्यकर्त्याला लाथ मारणं अयोग्य असल्याचं म्हणत या घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर ऐन निवडणुकीच्या काळात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे विरोधकांना दानवेंना घेरण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघात (Jalna Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारात भाजप सक्रिय नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर खोतकर यांनी सोमवारी भोकरदन येथे रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
त्यानंतर आमचे मनोमिलन झाल्याचे खोतकर यांनी जाहीर केले. यावेळी या दोघांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील केला. सत्कार करताना प्रसारमाध्यमांचे सहकारी अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) फोटो काढत होते. याचवेळी केवळ या दोन्ही नेत्यांचा फोटो काढायचा असल्याचं एक फोटोग्राफर म्हटल्यामुळे रावसाहेब दानवे यांनी शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या एका कार्यकर्त्याला लाथ मारली.
लाथ मारल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान लाथ मारलेला कार्यकर्ता हा दानवेंचा जवळचा मित्र असल्याचंही सांगितलं जात आहे. तरीही अशा प्रकारे वर्तन एका जेष्ठ नेत्याला शोभत नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. तर यापूर्वीही दानवे आपल्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे अनेकदा वादात सापडले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.