Jalna: DPDC मध्ये मंजूर केलेला रस्ताच गायब, तरीही उचलली लाखोंची बिलं; जिल्हाधिकारी कडक कारवाईच्या तयारीत

Jalna Road Scam, DPDC Road Corruption, Jalna News: जालना जिल्ह्यात डीपीडीसी निधीतील २५ रस्ते कामांमध्ये अनियमितता आढळली. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून चौकशी अहवालात संगनमताचा उल्लेख आहे.
Jalna Collector Ashima Mittal reviews the investigation into alleged irregularities in DPDC-funded road projects, with strict action proposed against officials and contractors.
Jalna Collector OfficeSarkarnama
Published on
Updated on

Jalna Road Scam: जालना जिल्हा नियोजन समितीच्या निधितून करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आणि तशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आठ जणांची त्रयस्थ समिती स्थापन करून तालुक्यातील ६० रस्त्यांच्या कामांची चौकशी सुरू केली होती.

या चौकशीतून २२ ते २५ रस्त्यांच्या कामात अनियमितता आढळून आल्याचे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी स्पष्ट केले आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Jalna Collector Ashima Mittal reviews the investigation into alleged irregularities in DPDC-funded road projects, with strict action proposed against officials and contractors.
Maharashtra Politics Live Update : 'देवाच्या इच्छेने, मी मंत्रिमंडळातून बाहेर' : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

डीपीडीसीतून करण्यात आलेल्या जालना तालुक्यातील इंदेवाडी ते सिरसवाडी रस्त्याचे काम न करताच लाखोंची बिले उचलण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल ६० रस्त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या ६० पैकी २५ रस्त्यांच्या कामात आता अनियमितता आढळून आल्याचे समोर आले आहे.

जालना जिल्ह्यातील २०० तर तालुक्यातील साठ अशा तब्बल २५०हून अधिक रस्ते कामांची चौकशी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या मार्फत सुरू होती. या समितीच्या अहवालानंतर ६० पैकी २५ रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. कंत्राटदारासोबत अधिकार्‍यांनी संगनमत करून कोटीचा अपहार केल्याचे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Jalna Collector Ashima Mittal reviews the investigation into alleged irregularities in DPDC-funded road projects, with strict action proposed against officials and contractors.
Maharashtra Political Live Update : मंदिरात भ्रष्टाचार होत असेल तर यापेक्षा गलिच्छ काय : सुप्रिया सुळे

बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर ठपका

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता शालगर यांच्यावर या प्रकरणासह विविध दहा प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे सीइओ डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनी त्यांचे निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. शासन स्तरावर यावर कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान मागील तीन वर्षात झालेल्या जिल्ह्यातील दोनशेहून अधिक रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी जिल्हा परिषदेच्या सीइओ यांनी दहा पथकांच्या माध्यमातून केली. याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता शालगर या आज शुक्रवार रोजी सादर करणार असल्याचे डॉ. कनवरिया यांनी सांगीतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com