
धाराशिव : राज्यातील माझ्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे आणि आरक्षण मिळू दे, असे साकडे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानीला घातले. जरांगे पाटील यांनी आज तुळजापूरात भवानीमातेचे दर्शन घेत मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळे दे, बळ दे असे आशिर्वाद मागितले.
राज्यात मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या, मराठा आरक्षण घेणारच, असेही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली. (Manoj Jarange Patil) मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करुन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. अशावेळी मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याची तयारी सुरु केली आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन होताच अंतरवाली सराटी येथे सामुहिक बेमुदत उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी यापुर्वीच दिला आहे. (Maratha Reservation) या पार्श्वभूमीवर आज त्यांनी तुळजापूर येते दर्शन घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांना पुढच्या रणनिती विषयी विचारले. राज्यात जे आमदार निवडून आले आहेत, मग ते मराठ्यांचे असो की ओबीसींचे सगळ्यांना मराठा समाजाने मतदान केले आहे.
त्यामुळे या सगळ्यांचीच जबादारी आता मराठा आरक्षणाचा विषय विधीमंडळाच्या सभागृहात मांडण्याची असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासाठी आवाज न उठवणाऱ्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात जायचे आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
नवे सरकार सत्तेवर येताच अंतरवाली सराटी किंवा मुंबईत सामुहिक उपोषण होऊ शकते, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. राजकारण हे आमचे क्षेत्र नाही, मुख्यमंत्री कोणीही झाले तरी आरक्षण मात्र घेणारच. मुख्यमंत्री कोण होणार यात मला पडायचं नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.