Manoj Jarange: एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, 'CM'पदी फडणवीसांची शक्यता, जरांगेंनी लढाई आक्रमक केली; म्हणाले...

Manoj Jarange On Mahayuti Government : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याने महायुतीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.पण जरांगेंनी सुरुवातीपासून ज्यांना टार्गेट केले,तेच भाजपचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत.
Manoj Jarange, Devendra Fadnavis
Manoj Jarange, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करत सरकारला घाम फोडला होता.पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी न लढण्याचा घोषणा केली. पाडापाडी आणि पाठिंब्याची भूमिका घेतली होती. पण राज्यात महायुती आता तब्बल 230 जागा जिंकत भक्कमपणे सत्तेवर आली आहे. आता मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आरक्षणासाठी दंड थोपटलं आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याने महायुतीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.पण जरांगेंनी सुरुवातीपासून ज्यांना टार्गेट केले,तेच भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे हे आक्रमक झाले असून त्यांनी सत्ता स्थापनेआधीच महायुती सरकारला मराठा आरक्षणावरुन इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांनी बुधवारी (ता.26) मराठा आरक्षणासंदर्भात मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा सामूहिक उपोषणाची साद घातली आहे.तसेच एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडण्यावरही भाष्य केलं आहे.ते म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण बाबतीत काम केले आहे, पण आम्हाला पण लढावे लागले होते.शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला, हा त्यांचा राजकीय विषय आहे, त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही, आम्ही आमच्याच कामात आहोत,असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Assembaly Election: चर्चा तर होणारच..! सलग 72 वर्षांपासून 'या' मतदारसंघात एकाच कुटुंबाची 'पॉवर'

जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री कोणीही होवो,आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु, मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे.कुणीही आले तरी सुख नव्हते,आम्हांला संघर्ष करावाच लागणार आहे.कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार,सुट्टी नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

'आजकालचे सरकार भावनाशून्य...'

मी आणि माझा समाज मैदानात नव्हतो.पण माझ्या समाजाने जे करायचं ते केलं आहे. माझ्या समाजाशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही. मराठा समाज ताकदीने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये. आजकालचे सरकार भावनाशून्य आहे, त्यांना भावनेची किंमत नाही, अशी टीकेची झोडही जरांगेंनी यावेळी सरकारवर उठवली.

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Amit Shah News : शिंदेंचा राजीनामा अन् अमित शहांनी दिला शिवसेना खासदारांना 'हा' सल्ला

'...तर पूर्ण राख झाली असती!'

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री कोणाला करायचे, हा त्यांचा विषय आहे. आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो आहोत. 132 पेक्षा जास्त मतदारसंघात 20 हजारांच्या आसपास महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र, त्या ठिकाणी मराठ्यांनी सभा लावली असती, तर पूर्ण राख झाली असती. महायुती जास्त मतांनी निवडून आली, म्हणजे आता तुमची जबाबदारी वाढली आहे, अशी भूमिकाही जरांगेंनी मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com