Jaykumar Gore : 'अमित देशमुखांनी जीना, टीपू सुलतानचे विचार पुढे घेऊन जावे...'; मंत्री जयकुमार गोरेंचा टोला

Amit Deshmukh Tipu Sultan Statement : मंत्री जयकुमार गोरे यांनी अमित देशमुख यांच्यवार टीका केली. तसेच सोनिया गांधींचे आत्मचरित्र वाचण्याची इच्छा देखील नसल्याचे सांगितले.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लातूरमध्ये टिपू सुलतान यांचे विचार नव्या पिढीला माहित होणे गरजेचे असल्याचे विधान नुकतेच केले. त्यासाठी त्याच्या जीवनावर आधारित पुस्तके उपलब्ध करून दिल्यास आपण ती वाटू, त्यासाठी लागेल ती मदत करू, असे आश्वासनही दिले. यावरून अमित देशमुख यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली.

अमित देशमुखांनी आता आता जीना, टीपू सुलतानचे विचार पुढे घेऊन जावे, असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पंचायत अभियान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शहरात आले होते. यावेळी माध्यमांनी केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र वाचणार का? या प्रश्नावर मला अजून सोनिया गांधी यांचे पुस्तक बघण्याचा योग आलेला नाही. मला ते वाचण्याची इच्छा देखील नाही. त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी त्या व्यक्त केलेल्या आहेत, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, जसा पंतप्रधानांचा ऑर्डिनन्स फाडण्याचा अधिकार त्यांना आहे, तसे आम्हाला हे पुस्तक फाडण्याचा अधिकार असल्याचे गोरे म्हणाले. आम्हाला पुस्तकातील काही गोष्टी आक्षेपहार्य वाटल्या तर ते फाडण्याचा अधिकार आम्हाला आहे. पुस्तकातील पान फाडताना बाळासाहेबांचा फोटो आहे हे लक्षात आल्यावर शायना एन.सी. यांनी ते फाडणं थांबवलं. त्यांची चूक झाली आहे, ती त्यांनी कबूल केली आहे.

अशा पद्धतीने अनावधानाने झालेल्या कृत्यावर अधिक राजकारण करणे योग्य नाही, असे म्हणत गोरे यांनी त्यांची पाठराखण केली.

Jaykumar Gore
Latur DCC Bank News: सहकार मंत्री पाटील यांना पळवून नेण्याचा डाव, अमित देशमुख यांचा भाजपवर खळबळजनक आरोप!

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली

बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना चाबकाचे फटके मारले पाहिजे, या खासदार संजय राऊत यांच्या विधानावरही गोरे यांनी चिमटा काढला. मग बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना कशाने मारले पाहिजे? याचा विचार आता तुम्ही करा, असे ते म्हणाले.

Jaykumar Gore
Nashik News : १० हजार सरपंच-ग्रामस्थ नाशिकमध्ये जमणार ; मंत्री जयकुमार गोरे पाहणीसाठी मोदी ग्राउंडवर, काय आहे कार्यक्रम?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.