Jogendra Kawade News : मुख्यमंत्री शिंदेंना मिळाली 'पीपल्स'ची ताकद, लवकरच...

Eknath Shinde : महायुतीत जाण्याबाबत जोंगेद्र कवाडे यांची मोठी घोषणा
Eknath Shinde Jogendra Kawade
Eknath Shinde Jogendra Kawade sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीने महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे हे संविधानवादी असल्याने त्यांच्यासोबत जाण्यात आम्हाला काहीही गैरवाटत नाही, अशी स्पष्ट भूमिका जोगेंद्र कवाडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मांडली.

Eknath Shinde Jogendra Kawade
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील कुणबी, मोठा पुरावा हाती...

महायुतीत आम्हाला लोकसभेच्या दोन जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचेही कवाडे यांनी सांगितले. महायुतीत भाजप, शिंदे गट, अजित पवार गट तर आहेतच. पण आमची पीपल्स रिपब्लिकन पार्टी, महादेव जानकरांचा पक्ष व नवनीत राणा यांचा पक्षही आहे, असे कवाडे यांनी सांगितले,

अलिकडेच मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक झाली. त्यात जागा वाटपावर चर्चा झाली. महायुतीत आमचा पक्ष लोकसभेच्या दोन जागा लढवू इच्छितो. याबद्दल लवकरच निर्णय होईल. तसेच विधानसभेच्या 21 जागा लढवू इच्छितो, असे कवाडे म्हणाले. तसेच लवकरच शिवशक्ती-भीमशक्ती आशिर्वाद यात्रा आपण सुरू करणार आहोत. संपुर्ण राज्यात ही यात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती कवाडे यांनी दिली.

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना अनुसूचित जातीचा नोकऱ्यांमधील अनुशेष भरण्याचा प्रयत्न झाला होता. हा अनुशेष सरकारने तातडीने भरावा, भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंवर अद्याप कारवाई झालेली नाही, ती तातडीने करावी, अशी आमची मागणी आहे, असे सांगत काही मंडळी रिपब्लिकन चळवळ संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कवाडे यांनी रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com