Jalna Maratha Andolan : ठिणगी पडली, आता वणवा पेटणार; जालन्यातील घटनेवरून कोल्हापूरमधील मराठा समाज आक्रमक

Kolhapur News : कोल्हापुरातील जनता जालन्यातील घटनेला उत्तर देईल.
Jalna Maratha Andolan
Jalna Maratha AndolanSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : जालनामध्ये पोलिसांनी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचे पडसाद राजभर उमटताना दिसत आहेत. कोल्हापुरातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यासंदर्भात आज मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. जालन्यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध नोंदवत राज्य सरकारवर तुफान आगपाखड करण्यात आली. (Maratha community in Kolhapur warned government about incident in Jalana)

मराठा समाज हा संयमी आहे. त्यामुळे जालनातील घटनेचे प्रतिसाद तीव्र उमटतील, पण शांततेच्या मार्गाने उमटतील. कोल्हापुरातील जनता याला उत्तर देईल. आता ठिणगी पडली आहे. वणवा पेटणार, असा इशारा मराठा समाजाचे समन्वयक ॲड. बाबा इंदुलकर यांनी दिला आहे.

Jalna Maratha Andolan
Uddhav Thackeray Meet Jalna : शरद पवार यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे जालन्यात; ठाकरे गट आक्रमक आंदोलनाच्या तयारीत ?

जालन्यातील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी आज कोल्हापुरात सायंकाळी मशाल पेटविण्यात येणार आहे, असेही ॲड. इंदुलकर यांनी सांगितले.

सरकार आम्हाला न्याय देणार की लाठ्या देणार : विनोद पाटील

दरम्यान, जालन्यातील लाठीचार्जचा मी निषेधच करतो. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मागील दीड वर्षात राज्य सरकारने आरक्षणासाठी काय ठोस पावले उचलली, ज्यामुळे समाजाचे समाधान होईल. विद्यार्थ्यांचा उद्रेक होणे स्वभाविक आहे. राज्य सरकार आम्हाला न्याय देणार की लाठ्या देणार, असा सवाल मराठा आरक्षणाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सांगितले.

Jalna Maratha Andolan
Jalna Maratha Andolan : ...तर नेत्यांना फिरणे मुश्कील होईल; मराठा पोरांमध्ये जशास तसे उत्तर देण्याची धमक !

सरकारने लाठ्या काट्याची भाषा बंद करावी. सरकारने योग्य तो निर्णय तत्काळ घ्यावा. तसेच, माझे सहकाऱ्यांना आवाहन आहे की, आपण देशाला आणि जगाला आदर्श घालून दिला होता, त्या आदर्शाप्रमाणेच शांततेत काम करू. पण, माझं आणि माझ्या समाजाचं दुर्दैव हे आहे की, राज्यातील प्रमुख चारही पक्ष आलटून पालटून सत्तेत आले. पण, एकही पक्ष मराठा आरक्षणाला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आमच्या बांधवांना लाठ्याकाठ्या खाव्या लागला, असा आरोपही पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com