MLA Kailas Patil News : शक्तीपीठ मार्ग रद्द करा; तो निधी मराठवाड्याच्या पाण्यासाठी द्या..

Maharashtra Assembly : शक्तीपीठ मार्ग रद्द करून तोच निधी मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी वापरावा, अशी मागणी राज्यपालच्या अभिभाषणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.
Kailas Patil
Kailas Patil Srakarnama

Dharashiv News : नागपूर ते गोवा हा महामार्ग प्रस्तावित असून त्याची आवश्यकता नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय राज्यातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. हा महामार्ग रद्द करून तोच निधी मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी वापरावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.

राज्यपालच्या अभिभाषणावर बोलताना कैलास पाटील (Kailas Patil) यांनी आपली भूमिका मांडली. 2023 पासून एक रुपयामध्ये विमा भरण्याची योजना सुरू केली. त्याचा गाजावाजा करण्यात आला. पण नुकसान भरपाई कमी व विमा कंपनीचा फायदा अधिक होत आहे, असे सांगतानाच पाटील यांनी सभागृहासमोर आकडेवारीच ठेवली. 2023 मध्ये जवळपास आठ हजार कोटींचा प्रीमियम भरण्यात आला त्यातून नुकसान भरपाईपोटी फक्त साडेतीन हजार कोटी मिळाले. (MLA Kailas Patil News)

मोदी सरकारने (Narendra Modi) आचारसंहिता असताना 30 एप्रिलला फक्त महाराष्ट्र राज्याकरिता एक परिपत्रक काढले. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. जिल्ह्यात 57 पैकी 37 मंडळ या परिपत्रकामुळे वंचीत राहिले आहेत. सरकारने हे परिपत्रक रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. कर्जमाफीमध्ये नियमित कर्जदार यांना अजूनही प्रोत्साहन पर अनुदान दिलेले नाही. निवडणुकीआधी ही रक्कम कर्जदारांना द्यावी.

16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. 46 हजार कोटी रुपयाच्या 20 निर्णयाच्या घोषणा केल्या. मात्र, त्यातील एक वगळता दुसऱ्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. नुसत्या घोषणा करून सरकार वेळ मारून नेत असल्याची टीका पाटील यांनी केली. शाळा सुरु होऊन पंधरा दिवस झाले तरी अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.

Kailas Patil
Bjp News : मोठी बातमी : भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, फुकेंना उमेदवारी

त्यासोबतच आरटीईच्या प्रवेशाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थी हे संभ्रमात आहेत, यावर लवकर निर्णय व्हावा. 2005 पूर्वी निवड होऊन नंतर रुजू झालेल्या ग्रामविकास विभागातील आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करावी इतर सर्व विभागाने ही कार्यवाही केली असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. (Edited By : Sachin Waghmare )

Kailas Patil
Dharashiv Kailas Patil News : फक्त.. पंचनामा व घोषणा नको, शेतकऱ्यांना पेरणीआधी मदत द्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com