Dharashiv power cut issue: आमदार कैलास पाटलांचा 'स्मार्ट' दणका! अव्वाच्या सव्वा वीजबिलांवर सीएम फडणवीसांचा मोठा निर्णय; सभागृहातच दिले 'हे' आदेश

Kailas Patil Dharashiv MLA News : धाराशिव जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या वीज प्रश्नांवर धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, परीक्षांच्या काळात अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी मुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणाकडून झालेल्या चुकीमुळे अनेजणांची वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अव्वाचे सव्वा बिल आले असल्याने एकदम इतके बिल भरणे नागरीकाना शक्य होणार नाही त्यामुळे त्या बिलाच्या रक्कमेचे हफ्ते पाडून द्यावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मागणी मान्य करीत हे आदेश दिले आहेत.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Shivsena UBT vs BJP : दोन मुलींच्या जन्मात केवळ 15 दिवसांचं अंतर! सोमय्यांनी लावून धरलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणात भाजप नगरसेवकच अडकणार

धाराशिव जिल्हयात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणाकडून झालेल्या चुकीमुळे अनेजणांची वीज पुरवठा खंडित झाला आहे. अव्वाचे सव्वा बिल आले असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, तसेच एकदम इतके बिल भरणे नागरीकाना शक्य होणार नाही त्यामुळं त्या बिलाच्या रक्कमेचे हफ्ते पाडून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
NCP Meeting : 'आम्ही ढवळाढवळ करणार नाही...', दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं; राष्ट्रवादीच्या बैठकीची इनसाईट स्टोरी!

दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणी मूळ वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मीटर चांगले असतानाही नवीन स्मार्ट मीटर बसवले आहेत. बिलाची रक्कम नोव्हेंबरमध्ये 700 रुपये तर डिसेंबरमध्ये 800 रुपये होती. तेच बिल जानेवारीमध्ये पंधरा हजारच्या घरात आले आहे. या बिलामध्ये दुरुस्ती करण्यात यावी तसेच हफ्ते पाडून देण्याची मागणी आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी केली.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Pune Congress : पुण्यात दारूण पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'मास्टरप्लॅन' तयार!दौंड, इंदापूर, बारामती टार्गेटवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कैलास पाटील यांची मागणी मान्य केली आहे. असे हफ्ते पाडून देण्यात अडचण नाही पण बिल मात्र भरावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले. वीज बिलाचे दर कमी केले असून स्मार्ट मीटर बसवले त्यांना दहा टक्के बिलामध्ये सवलत देण्यात आली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे आता हफ्ते पाडून वीज बिल भरण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Junnar Panchyat Samiti: जुन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी; एका मतासाठी थेट उपसभापतीपदाची ऑफर; NCP नेही प्लॅन बदलला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com