Kailas Patil : 5 हजारात शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करावी? ठाकरेंच्या आमदाराचा महायुती सरकारवर थेट हल्लाबोल!

Kailas Patil on Maharashtra government : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीवरून आमदार कैलास पाटील यांनी सरकारला सवाल केला. शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले.
Kailas Patil News
Kailas Patil NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought : दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्याची या सरकारने चेष्टा चालवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचे, पीकांचे नूकसान झालेले असताना हेक्टरी पन्नास हजार मदतीची अपेक्षा असताना केवळ पाच हजार रुपये तेही अग्रीम म्हणून कशी काय दिली जाऊ शकते? असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारला केला आहे.

महागाई वाढलेली आहे, तेलाचा डबा सत्तावीसशे रुपयांना झाला, तेव्हा पाच हजारात शेतकऱ्याने दिवाळी कशी साजरी करावी? याचे मार्गदर्शन सरकारनेच करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, तुमचे मंत्री, तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून आले. तेव्हा सरसकट मदत करण्याची घोषणा केली.

Kailas Patil News
IAS transfer : 23 IAS अधिकाऱ्यांचे तडकाफडकी ट्रान्सफर! MP च्या CM सचिवपदी सुखबीर सिंह; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

मात्र पुन्हा तुम्ही पंचनामे करून घेतले, शेतकऱ्यांना जीओ टॅगिंक, फोटो, आधार, बँक पासबुकची झेराॅक्स या सगळ्या गोष्टी करायला लावल्या. एवढेच नाही तर तुमचे केंद्रीय पथकही बांधावर येऊन पाहणी करून गेले. मग आता ठोस आणि भरीव मदत देण्याची वेळ असताना पाच हजार अग्रीम देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ का चोळताय? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

दुष्काळ जाहीर झाला तेव्हाच तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात ही आग्रीम रक्कम जमा केली असती, तर समजू शकलो असतो. परंतु आता दिवाळी गोड करण्याच्या नावाखाली शेतकऱ्याना पाच हजार अग्रीम देऊन त्यांचा अपमान करू नका. पाच हजारात दिवाळी साजरी होऊ शकते का? याचा विचार सरकारने केला पाहिजे. सरकारनेच केलेल्या दाव्यानूसार जर ८१ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर आता हेक्टरी पन्नास हजार एवढी भरीव मदत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे.

Kailas Patil News
Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर अन्...

पाच हजाराच्या मदतीत एकरी सोयबीन काढण्याचा खर्च तरी निघतो का? अग्रीमच्या नावाखाली शेतकऱ्यांना भरीव मदतीपासून वंचित ठेवू नका. दिवाळीला अजून अवकाश आहे, त्यामुळे घाईत पाच हजारावर शेतकऱ्यांची बोळवण करण्यापेक्षा सरकारने हेक्टरी पन्नास हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणीही कैलास पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com