Kalyan Kale Meet Chandrakant Khaire : आभार दौऱ्यानंतर, कल्याण काळेंचा नेत्यांच्या गाठीभेटीवर भर..

Kalyan Kale Meet chandrakant Khaire : महाविकास आघाडीच्या संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षभेद विसरून काळे यांना मदत केल्याची चर्चा आहे.
Kalyan Kale Meet Chandrakant Khaire : आभार दौऱ्यानंतर, कल्याण काळेंचा नेत्यांच्या गाठीभेटीवर भर..

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेच्या जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. 13 मे रोजी मतदान झाल्यानंतरच्या आकडेमोडीतूनच काळे यांना विजयाची खात्री पटली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरू केला होता.

प्रत्यक्ष निकालानंतर विजयाबद्दल त्यांचा आत्मविश्वास खरा ठरवला. तब्बल 1 लाख 9 हजार मतांच्या फरकाने काळे यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव केला होता. त्यांच्या विजयाला अनेक अदृश्य हातांची मदत झाली होती. याशिवाय महाविकास आघाडीच्या संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षभेद विसरून काळे यांना मदत केल्याची चर्चा आहे.

त्यामुळे या पक्षातील आणि पक्षाबाहेरील नेत्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी काळे यांनी सगळ्यांच्या भेटीचा धडाका लावला आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतल्यानंतर खासदार काळे (Kalyan Kale) यांनी नुकतीच अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.

त्यानंतर काल दिवसभरात काळे यांनी मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार नामदेव पवार, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) , शिवाजी बॅंकेचे चेअरमन रविंद्र काळे यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Kalyan Kale Meet Chandrakant Khaire : आभार दौऱ्यानंतर, कल्याण काळेंचा नेत्यांच्या गाठीभेटीवर भर..
Manoj Jarange Patil : गोड बोलून शिंदे सरकार मराठ्यांचा काटा काढतंय!

जालना लोकसभा मतदारसंघात कल्याण काळे यांनी 2009 नंतर पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. मराठा आरक्षण, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेली नाराजी याचा फायदा काळे यांना झाला. अपक्ष मंगेश साबळे यांनी दीड लाख मते घेतल्याने याचा फटका रावसाहेब दानवे यांना बसला. त्यामुळे दानवे यांचा विजयी षटकार हुकला. तर 2009 मध्ये थोडक्यात हुकलेल्या खासदारकीला काळे यांनी 2024 मध्ये गवसणी घालत मोठा विजय मिळवला.

Kalyan Kale Meet Chandrakant Khaire : आभार दौऱ्यानंतर, कल्याण काळेंचा नेत्यांच्या गाठीभेटीवर भर..
Raosaheb Danve : महायुतीने तुमचं काम केलं नाही का ? दानवे चांगलेच वैतागले; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com