Karuna Munde: "धनंजय मुंडेंच्या विधानसभा शपथपत्रात पत्नी म्हणून माझा उल्लेख नव्हता"; करुणा मुंडेंची तक्रार; कोर्टानं काय म्हटलं?

Karuna Munde: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात पत्नी म्हणून आपला उल्लेख नसल्याचा दावा करुणा शर्मा-मुंडे यांनी केला आहे.
Dhananjay Munde Karuna Munde 1
Dhananjay Munde Karuna Munde 1Sarkarnama
Published on
Updated on

Karuna Munde: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात पत्नी म्हणून आपला उल्लेख नसल्याचा दावा करुणा शर्मा-मुंडे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी थेट बीडच्या परळी कोर्टात धाव घेतली आहे. या कोर्टात आज झालेल्या सुनावणीला करुणा मुंडे प्रत्यक्ष हजर होत्या.

Dhananjay Munde Karuna Munde 1
Gunaratna Sadavarte: एसटी बँक संचालकांच्या बैठकीतील राड्याचं कारण आलं समोर! महिलांचं...; सदावर्तेंनी सगळंच सांगितलं

करुणा मुंडे का गेल्या कोर्टात?

महाराष्ट्र २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र सादर केलं होतं या शपथपत्रात त्यांनी करुणा शर्मा-मुंडे यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला नव्हता. तसंच यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेखही त्यांच्या शपथपत्रामध्ये नव्हता अशी तक्रार करुणा शर्मा-मुंडे यांनी ऑनलाईन पद्धतीनं केली होती. यावर आज परळीच्या कोर्टात विशेष सुनावणी पार पडली. यावेळी खुद्द करुणा मुंडे या आपले वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यासोबत कोर्टात हजर होत्या.

Dhananjay Munde Karuna Munde 1
Donald Trump Aadhar card : डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड काढलं 20 रुपयांत; Live दाखवलं... कशी होते बोगस मतदार नोंदणी?

कोर्टानं काय म्हटलं?

दरम्यान, आज जरी या प्रकरणावर सुनावणीसाठी कोर्टानं वेळ दिली असली तरी इतर महत्वाची प्रकरणं पेडिंग असल्यानं आज कोर्टाला या प्रकरणावर सुनावणीसाठी वेळ नसल्यानं यावर आता पुढच्या महिन्यानंतर सुनावणी पार पडले असं कोर्टानं सांगितलं. त्यामुळं आता ६ नोव्हेंबर २०२५ रोजी या प्रकरणाची सुनावणी परळीच्या कोर्टात पार पडणार आहे.

Dhananjay Munde Karuna Munde 1
Satara Politic's : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच शशिकांत शिंदेंचा पहिला दणका शिवेंद्रराजेंना; मानकुमरेंसोबत बंद दाराआड चर्चा!

करुणा मुंडेंचा नेमका आक्षेप काय?

विधानसभा निवडणुकीसाठी नियमाप्रमाणं उमेदवाराला आपल्या कुटुंबाबद्दल आणि एकूण संपत्तीबाबत माहिती शपथपत्राद्वारे सादर करावी लागते. त्यानुसार धनजंय मुंडे यांनी शपथपत्र सादर केलं पण त्यात आपल्या दोन्ही मुलांचा उल्लेख त्यांनी स्वतःची मुलं म्हणून केला पण पत्नी म्हणून आपला उल्लेख केला नाही. त्याचबरोबर माझ्या संपत्तीचाही उल्लेख त्यांनी आपल्या शपथपत्रात केला नाही, असा दावाही करुणा मुंडे यांनी केला आहे. अशा प्रकारे शपथपत्रात पत्नीचा आणि कुटुंबाच्या एकत्रीत संपत्तीचा उल्लेख लपवणं हा गुन्हा आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com