Gunaratna Sadavarte: एसटी बँक संचालकांच्या बैठकीतील राड्याचं कारण आलं समोर! महिलांचं...; सदावर्तेंनी सगळंच सांगितलं

Gunaratna Sadavarte: राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बँकेच्या संचालकांच्या बैठकीत काल एकनाथ शिंदे गट आणि गुणरत्न सदावर्ते गट या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता.
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte
Published on
Updated on

Gunaratna Sadavarte: राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बँकेच्या संचालकांच्या बैठकीत काल एकनाथ शिंदे गट आणि गुणरत्न सदावर्ते गट या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता. बैठकीतल्या कामकाजाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु असल्याच्या कारणावरुन हा वाद पेटला असल्याचं सांगितलं जात आहे. या राड्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला, यामध्ये या गोष्टी दिसून आल्या आहेत. पण या राड्याचं नेमकं काय कारणं होतं? याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली आहे? याचा खुलासा खुद्द अॅड. सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत केला.

Gunaratna Sadavarte
Satara Politics : देशमुख, घार्गे साईडलाईन, राष्ट्रवादीची सुत्रे अभयसिंह जगतापांकडे : पहिला वार थेट जयकुमार गोरेंवरच

सदावर्ते म्हणाले, "महिलांवर वाकडी नजर ठेऊन संस्थेतील काही आंबटशौकन लोकांनी अश्लिल पद्धतीनं एसटी बँकेतील कर्मचारी महिलांना तसंच काही पदाधिकारी महिलांना लैंगिक शोषणाचा त्रास देण्याचं काम हे लोक करत होते. हे वागणं चुकीचं आहे, असंविधानिक आहे असं त्यांना वारंवार सांगून सुद्धा हे लोक ऐकत नव्हते त्यामुळं काल याविरोधातील भावनांचा उद्रेक झाला. एसटीतल्या लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ अशा लिंगपिसाटांवर कारवाई करण्यात आली. काल माध्यमांनी हे सर्व दाखवलं.

एका अविवाहित मराठा समाजाच्या महिलेला मध्यरात्री देखील हे लोक त्रास देत होते. दुसऱ्या एका वंजारी समाजाच्या महिलेला अनेक अपशब्द वापरले गेले, तसंच तिसरी महिला ही आदिवासी समाजाची आहे, अशा प्रकारे महिलांवर लैंगिक शोषण करण्याची मजल गेली आहे. याच्या सर्व गोष्टी आमच्याकडं पुराव्यांसहित उपलब्ध आहेत, अशा शब्दांत सदावर्ते यांनी अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप पत्रकार परिषदेत केले.

Gunaratna Sadavarte
Mahayuti Leader : धंगेकरांपाठोपाठ आणखी एका नेत्यानं केली फडणवीस, शिंदेसह अजितदादांची कोंडी; विरोधकांना दिलं बळ...

दरम्यान, आता याप्रकरणी FIR दाखल झाली आहे. एफआयमधील तथ्ये हे अतिशय गंभीर आहेत. आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रु करण्यात आलं, ते या एफआयआरमध्ये आलं आहे. पोलिसांनी सचोटीनं या लिंगपिसाटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधातील जी कलमं आहेत त्यानुसार त्यांना ७ वर्षे ते जन्मठेपेपर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते. याचे पुरावे पोलिसांनी काळजीपूर्वक एकत्र केले आहेत. याविरोधात या लोकांनी आमच्या संचालकांविरोधात त्यांनी थातुरमातूर तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आता 'दुध का दुध, पानी का पानी' झालंय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या या लोकांवर काल आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Gunaratna Sadavarte
Tejashwi Yadav Wife : नववी शिकलेल्या तेजस्वी यादवांच्या पत्नीचे शिक्षण किती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com